पुणे

औषध विक्रीतील नियमभंगावर ‘एफडीए’चा बडगा

CD

नियमभंगावर एफडीए’चा बडगा
चार महिन्यांत ४,२५६ तपासण्या; २८८ परवाने रद्द, ८५६ निलंबित
मुंबई, ता. २१ : राज्यातील औषध उत्पादक आणि विक्रेत्यांवरील कारवाई तीव्र करत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून ते सप्टेंबर २०२६ या चार महिन्यांत ४,२५६ तपासण्या केल्या, या मोहिमेत औषधविक्रीचे २८८ परवाने रद्द करण्यात आले, तर ८५६ परवाने निलंबित करण्यात आले. याशिवाय, ३३ गुन्हे दाखल करून १४ जणांना अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान सुमारे १९.११ कोटी रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला किंवा विक्रीस प्रतिबंध घालण्यात आल्याची माहिती ‘एफडीए’ने दिली.
२५ मे २०२६ रोजी तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तपासण्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत प्रशासनाने ४६७ तपासण्या केल्या. त्यानंतरच्या चार महिन्यांत ही संख्या ४,२५६ वर पोहोचली. तपासण्यांची मासिक सरासरी २३४ वरून १,०६४ पर्यंत वाढली आहे. औषधांच्या विक्रीत होणारे नियमभंग रोखण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. औषधांची पावती न देता विक्री करणे, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय आवश्यक असलेली औषधे देणे, मुदत संपलेली औषधे विक्रीयोग्य औषधांसोबत ठेवणे तसेच नोंदणीकृत औषधनिर्मात्याच्या किंवा औषधविक्रेत्याच्या देखरेखीअभावी औषधांची विक्री करणे, अशा प्रकारांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान प्रशासनाने ११५ ठिकाणी झडती घेऊन औषधसाठा जप्त करण्याची किंवा विक्रीवर निर्बंध घालण्याची कारवाई केली. एप्रिल आणि मेमध्ये अशा केवळ आठ कारवाया झाल्या, या चार महिन्यांत नियमभंगप्रकरणी १,४०२ नोटिसाही बजावण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT