पिंपरी, ता. १३ ः अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) गणेशोत्सवाच्या तोंडावर तपासणी मोहीम राबवली आहे. त्यात पिंपरी चिंचवड शहरातील आस्थापने, दुकाने व मिठाई चालकांची तपासणी केली आहे. अशा जवळपास दीडशे तपासण्या झाल्या असून, त्यापैकी काही दोषींना सुधारणा नोटीस दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ही कारवाई आता इथून पुढे आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मिठाईच्या दुकानांसोबतच गणेश मंडळांकडून महाप्रसाद आणि सामूहिक अन्नवाटपाच्या कार्यक्रमावर देखील अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) नजर राहणार आहे. महाप्रसादाची ऑर्डर घेण्यापूर्वी संबंधित परवानाधारक केटरर्सनी एफडीएचा अधिकृत पूर्वनियोजन नमुना भरून संबंधित झोनच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडे सादर करणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे मिठाई चालकांना देखील स्वच्छतेबाबत दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दूध व दुग्धजन्य पदार्थ यांची पनीर, खवा, तूप यांची तपासणी केली आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरातील प्रामुख्याने गर्दीच्या ठिकाणी असलेली दुकाने, आस्थापने यांची तपासणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. पुण्यामध्ये पनीर, खवा यावर नुकतीच मोठ्या प्रमाणात कारवाई केली. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरात देखील काही संशयित ठिकाणी तपासणी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
---
पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये संशयित ठिकाणी त्याचप्रमाणे मिठाई दुकानांची तपासणी सुरू आहे. अशा जवळपास दीडशे दुकानांची पाहणी केली आहे. त्यामध्ये काही दोषी आढळलेल्या दुकानांना सुधारणा नोटीस दिली आहे. ही कारवाई येथून पुढे आणखी तीव्र करण्यात येईल
- संजय चट्टे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.