पुणे

पुणे विभागात अन्नपदार्थांचा सव्वा कोटींचा साठा जप्त

CD

पुणे, ता. २३ : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री आणि साठवणूक करणाऱ्या चार आस्थापनांवर कारवाई केली. या मोहिमेत एक कोटी १८ लाख ४३ हजार ३६४ रुपये किमतीचा साठा जप्त करून सहा जणांना अटक केली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात प्रशासनाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत चार गुन्हे दाखल केले असून एका आस्थापनेला टाळे ठोकले आहे. तसेच २३ लाख रुपये किमतीची दोन वाहनेही जप्त केली आहेत.
पिंपरी येथील रसरंग आस्थापनेतून २९ हजार ५०० रुपये किमतीचा ५९ किलो खवा जप्त करण्यात आला. खेड येथील सहारा डेअरी प्रॉडक्ट्स येथून ६१ हजार ६०० रुपये किमतीचा एक हजार ८०८ किलो शाही स्वीट हलवा आणि एक लाख ६२ हजार २०० रुपये किमतीचा ८११ किलो ए-१ स्वीट हलवा जप्त केला. हा साठा ‘मिसब्रँडेड’ असल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आला आहे.
बिबवेवाडी येथील मंगल नॅचरोकेअर येथून २३ हजार ३१६ रुपये किमतीचे ३९.१५ किलो गाईचे तूप जप्त करण्यात आले. आंबेगाव पठार येथील गालखा देवी स्वीट्स येथून दिशाभूल करणारे दावे केल्याप्रकरणी सात हजार ५०० रुपये किमतीची ३० किलो सोहन पापडी जप्त केली. पिंपरी येथील गणेश स्वीट्समधून ३८ हजार ८० रुपये किमतीचा ११९ किलो मिठामावा जप्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

Solapur LPG Cylinder: सोलापुरात घरगुती गॅस सिलिंडरसाठी नवा नियम; ऑनलाइन बुकिंग बंधनकारक, २५ दिवसांनंतरच दुसरा सिलिंडर

Marathi News Live Updates : ईडीचे पंजाब आणि हरियानात २५ ठिकाणी छापे

Nandurbar Bribery Case : मुलावर गुन्ह्याची भीती दाखवून 40 हजारांची लाच घेताना पोलिसपाटील एसीबीच्या जाळ्यात; 'लाचलुचपत'च्या कारवाईने नंदूरबारमध्ये उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT