पुणे

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर एफडीएची जोरदार धडक कारवाई

CD

चार उद्योगांचे परवाने
‘एफडीए’कडून निलंबित
परभणी, ता. १७ ः अन्न व औषध प्रशासनाने परभणी, जिंतूर येथे ८० लाख ८९ हजार रुपये किमतीचा ३१ हजार ९७० किलो अन्नसाठा जप्त केला. या कारवाईत जिल्ह्यातील एकूण चार आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी जिंतूर येथील खाद्यतेलाचे रिपॅकिंग करणाऱ्या तीन उद्योगांची झाडाझडती घेत खाद्यतेलाचा साठा जप्त केला.
मोंढा रोडवरील मे. मयूर एजन्सीज येथून रिफाइंड सोयाबीन तेल, रिफाइंड सनफ्लॉवर तेल व रिफाइंड पामोलिन तेलाचा तीन हजार ९६० किलो साठा (किंमत सहा लाख २६ हजार ९२० रुपये) जप्त केला. जिंतूर येथील औद्योगिक वसाहतीतील मे. अथर्व एजन्सीज येथून रिफाइंड सोयाबीनचा साडेतीन हजार किलोचा व सहा लाख ७० हजार १६० रुपये किमतीचा साठा जप्त केला, तर येलदरी रोडवरील मे. वरद ऑइल इंडस्ट्रीज येथून रिफाइंड सोयाबीन तेलाचा एक हजार ९६२ किलोचा व चार लाख ७७ हजार ९८५ रुपयांचा साठा जप्त केला. हा नऊ हजार ४२० किलोचा व १७ लाख ७५ हजार रुपये किमतीचा साठा तेलाचा दर्जा कमी असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT