पुणे

डास मारण्यासाठी तलवारीचा वापर का ?

CD

डास मारण्यासाठी तलवारीचा वापर का ?
एफडीएच्या कार्यपद्धतीवर उच्च न्यायालयाची टिप्पणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : तुम्ही तुमची धोरणे आक्रमकपणे राबवण्याच्या नादात थेट परवाना रद्द करण्याची कारवाई करत आहात. हे म्हणजे डास मारण्यासाठी थेट तलवारीचा वापर करण्यासारखे असल्याची टीका शुक्रवारी उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनावर (एफडीए) केली. या कार्यवाहीमागील कारणे स्पष्ट करण्याचे आदेशही न्यायालयाने आज पुन्हा एफडीएला दिले.  ॲमेझॉन रिटेल इंडिया''विरुद्धच्या कारवाईवरून न्यायालयाने हे खडे बोल सुनावले.
कठोर कारवाईची गरज नसतानाही आपली धोरणे अतिउत्साहाने राबवण्याचा प्रयत्न एफडीए करीत असल्याचे प्रभारी मुख्य न्या. रवींद्र घुगे आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने एफडीएला सुनावले. तसेच योग्यपद्धतीने काम करण्याचा सल्लाही दिला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केल्याबद्दल न्यायालयाने एफडीएचे कौतुकही करताना या परिस्थितीला सामोरे जाताना एफडीए सर्व व्यावसायिक आस्थापने बंद करणार का, असा प्रश्नही न्यायालयाने विचारला. मुदत संपलेले अन्नपदार्थ वैज्ञानिक पद्धतीने नष्ट करण्याऐवजी किरकोळ बाजारात पाठवल्याच्या आरोपावरून एफडीएने भिवंडीतील गोदामावर केलेल्या कारवाईविरोधात ॲमेझॉन रिटेल इंडियाने उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका केली होती. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी २४ जूनला गोदामाला भेट देऊन कोणतीही ''सुधारणा नोटीस'' न बजावता दुसऱ्याच दिवशी परवाना निलंबित केल्याचे ॲमेझॉनकडून वरिष्ठ वकील व्यंकटेश धोंड यांनी न्यायालयाला सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

Meesho Share Price: दसरा-दिवाळीआधी Meesho चा शेअर सुसाट! 110% रिटर्न; बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा

'तोंड पुसायला बायकोची ओढणी नाही का?’ गौरी खानची सोडून शाहरुखने मॅनेजरच्या ओढणीने पुसला चेहरा, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

विसर्जनाला 'अशा' हटके पद्धतीने बनवा उकडीचे मोदक! काय आहे काकूंच्या मोदकांची खासियत? Ukadiche Modak Recipe

Marathi News Live Updates : कोयना परिसरात भूकंपाचा धक्का !

SCROLL FOR NEXT