पुणे

राज्यात ३४.६१ लाखांचे भ्रामक सौंदर्यप्रसाधने जप्त

CD

राज्यात ३४.६१ लाखांची
भ्रामक सौंदर्यप्रसाधने जप्त
मुंबई, ता. १६ : राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भ्रामक दावे करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करून तयार केलेल्या सौंदर्यप्रसाधनांविरोधात मोहीम उघडली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड, मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट आणि कांदिवली येथील तीन स्वतंत्र कारवायांत ३४ लाख ६१ हजार ३५७ रुपये किमतीची सौंदर्यप्रसाधने, कच्चा माल आणि उत्पादनासाठी वापरण्यात येणारे घटक यांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
कराड येथील मे. राजलक्ष्मी टेलिकम्युनिकेशन या आस्थापनेच्या तपासणीत सौंदर्यप्रसाधनांच्या खोक्यांवर बॅच क्रमांक आणि उत्पादन तारीख नमूद होती; मात्र आतील बाटल्यांवरील लेबलवर हे छापलेले नव्‍हते. काही उत्पादनांवर परवाना क्रमांक हाेता; पण उत्पादकाची माहिती नव्हती. या ठिकाणाहून प्रशासनाने २९ लाख ४५ हजार ३७५ रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथील मे. ब्युटी सेंटरमध्येही तपासणी करण्यात आली. या वेळी शरीराचे अवयव मोठे करण्यापासून ते चरबी कमी करण्यापर्यंतचे दावे करणारी उत्पादने आढळली. त्यावर बॅच क्रमांक, परवाना क्रमांक आणि उत्पादकाची माहिती अपुरी होती. येथून एक लाख २० हजार १५२ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. १२ आणि १३ नाेव्‍हेंबरदरम्यान ही माेहीम राबवण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकांना वाटलं आम्ही हरलो... तीन कोटींची फसवणुक अन् जेल, 'रंग माझा वेगळा' फेम साईशाच्या आईने सोडलं मौन, म्हणते-

Farmer Agitation : बारामती ॲग्रोची गव्हाण बंद! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; ऊसाला प्रतिटन ४२०० रुपये दर व पहिली उचल ३९०० रुपये देण्याची मागणी

Latest Marathi News Update : सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बेमुदत आंदोलनाची घोषणा; उसाची पहिली उचल ३५०० रुपये मिळावी यासाठी संघटना आक्रमक

Latur Politics: विधानसभा पराभवानंतर धीरज देशमुखांचं दमदार कमबॅक; जिल्हा बँकेवर पुन्हा वर्चस्व!

'ठरलं तर मग' बंद करा आता म्हणणाऱ्याला जुई गडकरीनेच दिलं थेट उत्तर! म्हणाली, 'तुम्हाला आवडत नसेल तर...'

SCROLL FOR NEXT