पुणे

घरफोडीची धास्ती; गावी गेलेल्या पुणेकरांच्या मनात शंकेची पाल 

सनील गाडेकर, सकाळ वृत्तसेवा

पुणे -  प्रसन्न वातावरण, मोजके व जवळचे लोक, ताज्या भाज्या, विविध फळे आणि घराबाहेर पडण्याचे स्वातंत्र्य, अशा आल्हाददायक वातावरणात पुण्यातून आपल्या गावी गेलेल्या नागरिकांचे आयुष्य सुरू आहे. पण, शहरातील लॉकडाउनमुळे शुकशुकाट आहे. त्यामुळे शहरात घरफोडीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे आपल्याही घरात चोर घुसणार नाही ना ?, अशी शंकेची पाल चुकचुकत आहे. 

लॉकडाउनमुळे व्यवहार ठप्प झाल्याने व नोकरदारांना सुटी असल्याने मार्चच्या अखेरीस व एप्रिलच्या सुरवातीला कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी गावाकडे गेलेलं बरं, या भावनेतून ही सर्व मंडळी सहकुटुंब गावातच राहात आहेत. दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पोलिस बंदोबस्तात गुंतले असताना रिक्‍त सोसायट्या, चाळी आणि विविध वसाहती चोरट्यांसाठी मोकळे रान ठरत आहे. त्यामुळेच घरफोड्यांचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. गावाकडे निर्धास्त राहणाऱ्यांच्या पुण्यातील घरी चोरी झाल्यास त्यांना नाइलाजाने पुण्यात येऊन तक्रार दाखल करावी लागत आहे. सध्या प्रवास करणे थोडेसे सोपे झाले आहे म्हणून बरे. अन्यथा पास काढणे, येताना पोलिसांना घडलेला प्रसंग सांगून त्यांना प्रवास करावा लागत होता. 

आमच्या घराकडे लक्ष ठेवा 
परगावी गेलेल्या नागरिकांचा शेजारीच आता पोलिस बनला आहे. आमच्या घराकडे लक्ष ठेवा, अशी विनंती केली जात आहे. प्रत्येक ठिकाणी किंवा सोसायटीत सीसीटीव्ही आहेच, असे नाही. त्यामुळे अशा घरांची सुरक्षा रामभरोसेच आहे. मात्र, घरापेक्षा स्वत: सुरक्षित राहणे गरजेचे आहे, अशी भावना नागरिकांची असून परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत गावीच थांबणार अशा भूमिकेत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

चोरटेही बेफिकीर 
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी घरातच बसून रहा. नवीन ठिकाणी स्पर्श केल्यास किंवा अनोळखी ठिकाणी गेल्यास स्वच्छ हात धुवा, असे आवाहन प्रशासनाने वारंवार केले आहे. मात्र, चोरट्यांना ना कोरोनाची भीती आहे ना पोलिसांची. त्यामुळे कोविड-19 सारख्या परिस्थितीत देखील चोर बाहेर पडून घरफोड्या करत आहेत. 

काय काळजी घ्याल? 
घर सुरक्षित असल्याची खातरजमा करा 
शेजारी, मित्रमंडळींना फोन करून घराची माहिती घ्या 
सुरक्षारक्षकाला गावी गेल्याची कल्पना द्यावी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT