Fear of corona causes patients to ignore the symptoms of other illnesses 
पुणे

कोरोना काळात इतर आजारांकडे दुर्लक्ष होतेयं? वाचा, काय म्हणतायेत तज्ज्ञ

योगिराज प्रभुणे

पुणे : कोरोनाच्या भीतीमुळे रुग्ण इतर आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आता इतर आजारांची गुंतागुंत वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदले आहे. 

पुण्यात आपण प्रत्येक जण सध्या कोरोना विषाणूंच्या उद्रेकाशी लढत आहोत. त्याचा फैलाव वेगाने होत असल्याचे दिसते. या विषाणूंच्या उद्रेकाचा उच्चांकावर आपण आहोत, किंवा त्यापासून थोडे पुढे आलोय, किंबहुना तो उच्चांक अजून यायचा आहे, हे काहीही असेल ते असेल. पण, एका गोष्टीकडे आपल्या सगळ्यांच दुर्लक्ष होतंय ते म्हणजे इतर आजार. क्षयरोगामुळे देशभरामध्ये जितक्या रुग्णांचा मृत्यू होतो, तितके मृत्यू आजही कोरोनामुळे होत नाहीत. कर्करोगाची स्थिती यापेक्षा निश्चितच वेगळी नाही. त्यामुळे कोरोनामुळे इतर आजारांकडे दुर्लक्ष करून आता आपल्याला चालणार नाही, असा सल्लाही त्यांनी दिला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हृदयविकाराच्या रुग्णांवरही तातडीने उपचार करण्याची गरज असते. पण, कोरोनाच्या भीतीमुळे वेळेत रुग्णालयात पोचत नाहीत. त्याचा थेट परिणाम रुग्णाच्या आरोग्यावर होतो, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

कोरोनाचा संसर्ग झाला नसलेल्या बहुसंख्य रुग्णांना इतर आजार आहेत. ते होत आहेत. त्यात कर्करोगासह क्षयरोग, इतर जंतूसंसर्गापासून ते मधुमेह, नेत्रविकारापर्यंतच्या वेगवेगळ्या आजारांचा समावेश होतो. पण, कोरोनाच्या भीतीमुळे या सगळ्या आजारांकडे रुग्णाचे गेल्या पाच-सहा महिन्यांमध्ये दुर्लक्ष होत असल्याचे प्रकर्षाने दिसून आले आहे, असे निरीक्षण कर्करोग तज्ज्ञ डॉ. रेश्मा पुराणिक यांनी नोंदविले. 

मोठी बातमी : घरांचे दर होणार कमी; राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय!

कोरोना नावाचं वादळ आपल्या भोवती घोंगावत आहे. त्याचे निश्चितच काळजी आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे. ती घ्यावीच लागणार आहे. पण, इतर आजारांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण, शरीरात एखाद्या ठिकाणी गाठ लागत असले आणि कोरोना कमी झाल्यानंतर ती डॉक्टरांना दाखवू, असा विचार करून रुग्ण घरात बसल्याची काही उदाहरणे आहेत. त्यामुळे ती गाठ कर्करोगाची असल्यास पहिल्या टप्प्यातील हा रोग पुढे गुंतागुंतीचा होण्याचा धोका असतो. बहुतांश रुग्ण उशिरा उपचारांसाठी येत आहेत. उशिरा झालेल्या निदानामुळे रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता मंदावत जाते, असे त्यांनी सांगितले.

“कोव्हिडबद्दल काळजी जरूर घेऊया. मास्क वापरणं, हँड सॅनिटाझर, वारंवार साबणाने हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टेंसिंग हे सगळं जरूर केलंच पाहिजे. पण, त्याच बरोबरीने काही असे आजार असतात त्याचे वेळेत अचूक निदान होणं आवश्यक असते. त्यावर आवश्यकता असेल तर प्रभावी उपचार होणं महत्त्वाचं असतं. या बाबत भीती न बाळगता डॉक्टरांचा सल्ला घ्या,”
-    डॉ. अनंतभूषण रानडे, माजी अध्यक्ष ‘इंडियन सोसायटी आँफ मेडिकल अँण्ड पेडियाट्रिक आँकोलॉजी’  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT