पुणे

चाकणमधील उद्योजकांना गुंडांची भीती

रूपेश बुट्टे

आंबेठाण - चाकण औद्योगिक वसाहतीत स्थानिक भूमिपुत्र आणि पदाधिकारी असल्याचे सांगत कारखानदारांना धमकावून कामगारांना मारहाण करण्याच्या प्रकारामुळे कारखानदार आणि गुंतवणूकदार यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. कामगारांना मारहाण करून कंपनीबाहेर काढले जात असल्याने त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक २ लगतच्या काही कंपन्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी मावळ तालुक्‍यातील गुंड प्रवृत्तीचे तरुण मद्यधुंदावस्थेत आले. त्यांनी सरपंच असल्याचे सांगत तीन कंपन्यांतील कामगारांना दमदाटी करत कंपनीबाहेर काढले. या प्रकारामुळे कामगार कामावर येण्यास धजावत नाहीत. 

चाकण एमआयडीसीच्या पाचव्या टप्प्याचा मोबदला वाटप सुरू आहे. प्रचंड विस्तारलेल्या या औद्योगिक भागात कामगारांना मारहाण, लूटमार, विविध ठेक्‍यांसाठी कंपनी व्यवस्थापकाला दमदाटी करणे, कामगारांचे पगार थकविणे आणि कालांतराने बुडविणे, महिला कामगारांची टिंगलटवाळी आदी घटना नित्याच्या झाल्या आहेत. बिरदवडी येथे नुकताच झालेला लहान व्यावसायिकाचा खून, काही महिन्यांपूर्वी टप्पा क्रमांक २ मध्ये कंपनी व्यवस्थापकाला मारहाण, वासुली येथे एका लोकप्रतिनिधीच्या कार्यालयावर जीवघेणा हल्ला, अशा घटना या भागाच्या साक्षीदार आहेत.

सर्वांनी औद्योगिक भागात शांतता टिकवून सद्य परिस्थितीतून मार्ग काढणे गरजेचे आहे. भविष्यात अन्य गुंतवणूकदार या भागात गुंतवणूक करण्यासाठी धजावणार नाहीत, असे एका कंपनी व्यवस्थापकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

राजकीय लोकांचा हस्तक्षेप 
बहुतांश ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींसह तालुक्‍यातील नेतेमंडळी, मावळ, पिंपरी-चिंचवड, भोसरी या भागांसह जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी या भागांकडे ‘मलई केंद्र’ म्हणून पाहत आहेत. त्यांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. स्वतःच्या बगलबच्च्यांना ठेके मिळवून देण्यासाठी कंपनी व्यवस्थापकांना त्यांच्याकडून फोनाफोनी होते.

नागरिकांच्या काही मागण्या किंवा तक्रारी असतील; तर त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखत शासनाच्या विविध विभागांकडे दाद मागावी. कायदा हातात घेऊ नये. असे प्रकार घडले, तर गुंतवणूकदार गुंतवणूक करणार नाहीत, सरकारचा महसूल बुडेल. कारखानदारीच्या माध्यमातून मिळत असलेला रोजगार बुडून व्यवसाय बंद पडतील. दहशत माजवू नये.
 - दिलीप बटवाल, सचिव, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT