Fee waived by ICSI for defense personnel families of martyrs decision was taken on anniversary Sakal
पुणे

ICSI : ‘आयसीएसआय’तर्फे संरक्षण कर्मचारी, शहिदांच्या कुटुंबांसाठी शुल्क माफ

वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आला निर्णय

- मीनाक्षी गुरव

पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय) यांच्या वतीने ५५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त संरक्षण कर्मचारी, अग्निवीर आणि शहिदांच्या कुटुंबांसाठी आयसीएससीने शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शहीदांच्या मुलींच्या शिक्षणासाठी ११ लाख रुपये केंद्र सरकारला दिले आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सीएस मनीष गुप्ता यांनी दिली.

द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ही संस्था कंपनी सेक्रेटरीज कायदा १९८० अंतर्गत स्थापन झालेली उच्च व्यावसायिक संस्था आहे. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त गुप्ता यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुप्ता म्हणाले,‘‘संस्थेने कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमात बदल केला आहे.

नवीन रचनेतील अभ्यासक्रम व्यावहारिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण करणारा आहे. आतापर्यंत आयसीएसआयचे ७१ हजार सदस्य आहेत. तर दोन लाख विद्यार्थी सीएसचा अभ्यास करत आहेत. याशिवाय वर्धापनदिनानिमित्त संस्थेने तक्रार निवारण कक्ष तयार केला आहे. यात पोर्टल आणि कॉल सेंटरद्वारे येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.’’

आयसीएसआय संस्थेने लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटे, उत्तर-पूर्व राज्य, दमन, दीव आणि पाँडेचेरी येथे अभ्यास केंद्र योजनेअंतर्गत अभ्यास केंद्रांची स्थापना केल्याची माहिती गुप्ता यांनी यावेळी दिली.

शहीद जवानांच्या मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार

‘‘देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. ‘शहीद की बेटी’ उपक्रमांतर्गत विविध प्रयत्न सुरू आहेत. संस्थेच्या विविध कार्यक्रमांसाठी आमंत्रित मान्यवर किंवा वक्ते यांना स्मृतीचिन्ह आणि इतर भेटवस्तू देणे बंद केले असून त्या रक्कमेचा वापर शहिदांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि कल्याणकारी योजनांसाठी केला जाणार आहे. संस्थेने ‘आयसीएसआय स्टुडंट्स एज्युकेशन फंड ट्रस्ट’ तयार केले आहे. यात आर्थिकदृष्ट्या मागास आणि शैक्षणिकदृष्ट्या उज्ज्वल विद्यार्थ्यांना कंपनी सेक्रेटरी कोर्स करण्यास प्रोत्साहन देण्यात येईल.’’

- सीएस मनीष गुप्ता, अध्यक्ष, द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मक्का मदिनाजवळ भीषण अपघात! ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू; डिझेल टँकरला बस धडकली अन्...

Congo Mine Accident : तांब्याच्या खाणीवर पूल कोसळला, ४० कामगारांचा मृत्यू, शेकडो जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Vanaz Metro Subway Issues : रस्ता ओलांडायचा तर भुयारी मार्गातूनच; पण अनधिकृत पार्किंगमुळे पादचाऱ्यांचा जीव मेटाकुटीला

Stainless Steel vs Glass Electric Kettle: स्टेनलेस स्टील कि काचेची इलेक्ट्रिक केटल? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फरक

Kalyan-Dombivli Politics:'दीपेश म्हात्रे यांच्या प्रवेशामागे कोण?'; कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं, भाजपमधील इनसाईड गेमची मोठी चर्चा..

SCROLL FOR NEXT