पुणे

23 गावांच्या समावेशाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा अभिप्राय मागविला; जाणुन घ्या कोणती गावे येणार महापालिकेत

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला (पुणे): महापालिकेची निवडणूक चौदा महिन्यांवर आली असताना 24 नोव्हेंबर 2020 रोजी राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने पुणे महापालिकेत नव्याने 23 गावांचा समावेश करण्याच्या बाबतीत जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे माहिती व अभिप्राय मागविली आहे. यामुळे 23 गावाच्या पालिकेत समावेशाच्या हालचालींना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. 

गावांच्या पुणे पालिकेत समावेशाबाबत एक रिट याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावेळी, उर्वरित गावे टप्प्याटप्प्याने पुणे पालिकेत समावेश करण्यात येतील. असे राज्य सरकारच्या वतीने 13 जुलै 2017 मध्ये नगर विकास विभागाच्या न्यायालयात सांगितले होते. त्यास अनुसरून समाविष्ट करायच्या गावांचा क्षेत्रांचा तपशील तसेच गावांचा समावेश केल्यानंतर पुणे शहरांची होणारी सुधारित हद्द सर्वे नंबर यासह जिल्हाधिकाऱ्यांनी अभिप्रायासह शासनास तातडीने सादर करावा करण्याचे आदेश नगर विकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

'...म्हणून आत्महत्या नाही करू शकलो'; गौतम पाषाणकरांनी सांगितली 'मन की बात'!​

मंतरवाडी या संपूर्ण गावाचे महसुली क्षेत्र समाविष्ट करायचे आहे की, आधी काही क्षेत्र पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आले आहे, उर्वरित क्षेत्र समाविष्ट करायचे आहे की तपासावी, असे ही या आदेशात म्हटले आहे. समाविष्ट होणारी गावे हवेली व मुळशी तालुक्यातील आहे. मुळशीतील 3 व हवेलीतील 20 गावांचा यात समावेश आहे. ही गावे समाविष्ट झाल्यानंतर पुणे महापालिकेची हद्द मुंबई पालिकेपेक्षा मोठी होणार आहे. 

समाविष्ट होणारी 23 गावे
म्हाळुंगे, सुस, बावधन बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, न्यू कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, मंतरवाडी, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी, वाघोली या 23 गावांचा समावेश होणार आहे.

Corona Updates: ३५ दिवसांनंतर पुणे जिल्ह्यात पुन्हा रुग्णांचा आकडा हजारापार!​

(Edited By Sharayu Kakade)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT