jumbo Covid Canter SYSTEM
पुणे

‘जम्बो’त महिला डॉक्टर अव्वल; कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सलग दोन-अडीच महिने रुग्णांची सेवेत महिला डॉक्टरच आघाडीवर असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. अशा २५ महिला डॉक्टर, नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या पाठीवर मंगळवारी शाबासकीची थाप पडली आणि त्यांना प्रोत्साहन म्हणून रोख रकमेचे पारितोषिकही दिले. शिवाजीनगरमधील जम्बो हॉस्पिटलमधील वैदकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन झाले. महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची कामगिरी उजवी असल्याचे पाहणीतून दिसून आले. (Female doctor tops jumbo covid centre_

येथील जम्बो गेल्या अडीच महिन्यांपासून दोन हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार झाले. त्यातील ९० टक्क्यांहून अधिक रुग्ण उपचारानंतर बरेही झाले. त्यासाठी काही डॉक्टरांनी एकही सुट्टी न घेता सलग अडीच महिने काम केले आहे. या पुढील काळात डॉक्टर, नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘बेस्ट परफॉर्मन्स असलेल्यांचा सत्कार करण्यात आला. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल, अग्रवाल, जम्बोचे समन्वयक राजेंद्र मुठे, जम्बोचे ‘सीईओ’ अंबर आयदे, अधिष्ठाता डॉ. श्रेयांस कपाले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

‘एकाच ठिकाणी सर्वाधिक रुग्ण असलेल्या ‘जम्बो’तील उपचार व्यवस्थेमुळेच कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळालेच पाहिजे. कोरोनाचा संसर्ग संपेपर्यंत जम्बोचे अस्तित्व राहणार असल्याने अधिक क्षमतेचे काम करण्याची गरज आहे,’’ असे अग्रवाल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BAN vs AUS: दिल्लीत जन्म, पंजाबमध्ये गिरवले क्रिकेटचे धडे अन् आता थेट ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण... कोण आहे Nikhil Chaudhary?

विदर्भातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास होणार आरामदायी, 'या' एक्सप्रेसमध्ये लागणार LHB कोच, रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

'हे फक्त आमिरच करू शकतो!' एकाच कारमध्ये दोन सवती आणि होणारी तिसरी बायको! व्हिडिओ पाहून चकित व्हाल

Ramdara Mandir: भाविकांसाठी महत्त्वाची सूचना! रामदरा मंदिर १८ जुलैपर्यंत बंद; गर्भगृहाच्या नूतनीकरणासाठी मोठा निर्णय

Kolhapur Water Crisis : कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' 10 नद्यांवर पुन्हा उपसाबंदी लागू; पाटबंधारे विभागाचा मोठा निर्णय, शेती पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

SCROLL FOR NEXT