female dr died Coronavirus rumor know facts with sakal 
पुणे

Video:पुण्यात कोरोनामुळं महिलेचा मृत्यू झाल्याची अफवा; जाणून घ्या वास्तव 

सकाळ डिजिटल टीम

पुणे Coronavirus : कोरोना लॉकडाऊनमध्ये सगळ्यांत मोठी समस्या असेल तर ती सोशल मीडियावरील अफवांची, रोज एक नवी अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. पुण्यात आज, एका महिलेचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रास्ता पेठेत राहणाऱ्या मेघा श्रीकांत व्यास- शर्मा (वय 33) यांच्या मृत्यूबाबत फेसबुक, व्हाट्सएपवर उलट- सुलट चर्चा असलेला मजकूर फिरत आहे. सकाळने factswithsakalअंतर्गत शोध घेतला असता,  शर्मा यांचा कोरोनामुळे नव्हे तर हृदयविकारामुळे मृत्यू झाल्यााची माहिती मिळाली. त्यामुळे सोशल मीडियावर या बाबत फिरत असलेली पोस्ट ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत माहिती अशी, शर्मा यांना 22 एप्रिल रोजी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांची कोरोनाचीही चाचणी झाली होती. ती निगेटिव्ह आली आहे. त्या मुळे त्यांच्या मृत्यूचा आणि कोरोनाचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत्यू दाखल्यातही तसेच म्हटले आहे. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मेघा यांना 8 वर्षांचा मुलगा आहे. त्यांचे पती श्रीकांत हे डॉक्टर आहेत. मेघा यांच्या मृत्यूचा कोरोनाशी संबंध सोशल मीडियावर जोडण्यात आल्यामुळे शर्मा, व्यास कुटुंबियांना त्रास होत असल्याचे स्थानिक नगरसेविका पल्लवी जावळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT