महिला अधिकारी लाच घेताना ताब्यात Sakal
पुणे

Pune Crime News : जीएसटी कार्यालयातील महिला अधिकारी लाच घेताना ताब्यात

वस्तू आणि सेवा कार्यालयातील (जीएसटी) महिला अधिकाऱ्यास तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने ताब्यात घेतले. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : वस्तू आणि सेवा कार्यालयातील (जीएसटी) महिला अधिकाऱ्यास तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने ताब्यात घेतले. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी एका ३२ वर्षीय व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात तक्रार दिली आहे. मालती रमेश कठाळे (वय ४३) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाने पत्नीच्या नावाने नवीन जीएसटी क्रमांक घेण्यासाठी वस्तू आणि सेवा कार्यालयात ऑनलाइन अर्ज केला होता.

त्यासाठी अडीच हजार रुपये शुल्क भरले होते. हे प्रकरण वर्ग-२ अधिकारी मालती कठाळे यांच्याकडे प्रलंबित होते. कठाळे यांनी व्यावसायिकास कार्यालयात समक्ष बोलावून जीएसटी क्रमांकांसाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली.

याबाबत व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात तक्रार दिली. त्याची शहानिशा करून ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. ६) सायंकाळी जीएसटी कार्यालयात सापळा रचून कठाळे यांना लाच स्वीकारताना ताब्यात घेतले.

‘एसीबी’चे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Bihar CM: राजकारणात मोठी घडामोड! बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? निर्णय आता शिवराज चौहान यांच्या हाती, भाजपचा गेमचेंजर प्लॅन तयार

Ambadas Danve News: रक्ताने माखलेला शर्ट, दानवेंनी वाचवला एका व्यक्तीचा जीव...

IPL 2026, LSG vs GT: प्रसिद्ध कृष्णाचा तिखट माऱ्याने लखनौची फलंदाजी गडबडली; गिलच्या गुजरातसमोर सोपं लक्ष्य

SCROLL FOR NEXT