पुणे, ता. १८ : पबमध्ये ओळख झाल्यानंतर घरी सोडण्याच्या बहाण्याने तिघा नराधमांनी एका महिला वकिलाला मोटारीत बसवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोरेगाव पार्क-मुंढवा रस्त्यावर रविवारी (ता. १७) मध्यरात्री घडली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी (ता. १८) कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साधारण तिशीच्या वयातील आहेत. पीडित महिला व्यवसायाने वकील आहे. ती रविवारी रात्री कोरेगाव पार्क परिसरातील एका पबमध्ये गेली होती. तेथे तिची आरोपींशी भेट झाल्यानंतर त्यांच्यात ओळख झाली. पब बंद झाल्यानंतर ‘तुला घरी सोडतो’, असे सांगत आरोपींनी महिलेचा विश्वास संपादन केला. तिघे आरोपी तिला घेऊन मुंढवा-कोरेगाव पार्क रस्त्याने निघाले. मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावरील निर्जन ठिकाणी मोटार थांबवून आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्यांनी अन्य एका मित्रालाही बोलावून घेतले, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेनंतर आरोपी पीडित महिलेला सोडून तेथून पसार झाले.
सीसीटीव्हीच्या आधारे तपास ः
घटनेची माहिती मिळताच कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. पोलिसांकडून कोरेगाव पार्क-मुंढवा रस्त्यावरील संबंधित पब आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत तिघांना ताब्यात घेतले आहे. अन्य एका आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.