female police sub-inspector Chaturshringi Police Station suspended for not attending to complaint against youth Sakal
पुणे

Pune News : खून झालेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष; महिला पोलिस उपनिरीक्षकाचे निलंबन

तरुणाविरोधात दिलेल्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या चतु:शृंगी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षकास निलंबित करण्यात आले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तरुणाविरोधात दिलेल्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या चतु:शृंगी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षकास निलंबित करण्यात आले. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नियंत्रण लक्षात बदली करण्यात आली. वैशाली सूळ यांना सोमवारी निलंबित करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक शामल पाटील यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. तर पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. औंध येथील एका 26 वर्षीय तरुणीचां तिच्या ओळखीचा तरुण प्रतीक ढमाले याने खून केल्याची घटना नुकतीच घडली होती. याबाबतची तक्रार तरुणीच्या कुटुंबीयांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात दिली होती. तरुणी व प्रतीक यांचे प्रेमसंबंध होते.

ते एकमेकांच्या नात्यातील होते. तरुणाची वर्तणूक चांगली नसल्याने तरुणीने त्याच्याशी संबंध तोडले होते. औंधमधील सिद्धार्थनगर सोसायटीच्या पार्किंगमध्ये भेटण्याचे कारण देऊन त्याने तिला बोलावले. रागाच्या भरात प्रतीकने तिच्यावर चाकूने हल्ला करून तिचा खून केला होता. याप्रकरणी प्रतीक ढमाले, त्याचे वडील किसन ढमाले (वय ५०), प्रतीकचा मित्र रोहित (वय २७) यांच्यावर चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, प्रतीकनेही आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती.

दरम्यान, संबंधित प्रतीक हा तरुणीला त्रास देत असल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी त्याच्या विरोधात तक्रार दिली होती. पोलिसांनी वेगवेगळी कारणे देत तक्रारीनंतर योग्य ती कारवाई केली नाही, त्यामुळे तरुणीला प्राणास मुकावे लागले, असा ठपका संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार, वैशाली सूळ यांचे सोमवारी निलंबन करण्यात आले.पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक व अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी याबाबत सोमवारी कारवाईचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२ कोटींची रोकड, ६ कोटींचे दागिने अन्...; काँग्रेस आमदाराकडे आढळलं घबाड, जप्त केलेल्या मुद्देमालाचा आकडा वाचून व्हाल थक्क

"माझ्या मुलाला वाचवा मी..." मुलाच्या जन्मावेळेस ढसाढसा रडू लागला गोविंदा; "गर्भलिंग निदान चाचणी.."

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Latest Marathi News Updates : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळ्याला, उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

SCROLL FOR NEXT