पुणे

#SundayMotivation : अन् रिक्षाचालक महिलांची उलगडली कहाणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यात सुमारे सतरा तर पिंपरी-चिंचवडमध्ये पन्नासच्या आसपास महिला रिक्षाचालक आहेत, हे माहीत आहे का? देशातील पहिली महिला रिक्षाचालकही पुण्यातीलच आहे. महिलांनी धडाडीने या क्षेत्रात पुढे येण्याची गरज आहे. "सकाळ' कार्यालयाला काही रिक्षाचालक महिलांनी भेट देऊन आपल्या कामाचा लेखाजोखा मांडला. 

बारावी नापास ते बी.कॉम. पर्यंत शिकलेल्या 67 महिला रिक्षा चालवण्याचा व्यवसाय मोठ्या धडाडीने करत आहेत. विशेष म्हणजे त्या नागरिकांना सुखरूप प्रवास घडवीत आहेत. यांच्यापैकी शीला डावरे म्हणाल्या, ""मी तीस वर्षांपूर्वी रिक्षा चालवायला सुरुवात केली. विशेष म्हणजे "देशातील पहिली महिला रिक्षाचालक' म्हणून माझा सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आला. रिक्षा चालवण्याचे महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी ऍकॅडमी सुरू केली आहे.'' 

कोथरूडमधील मनीषा शिंदे दोन वर्षांपासून रिक्षा चालवीत आहेत. त्या म्हणाल्या, ""नवऱ्याने काही काळ शिफ्टवर दुसऱ्यांची रिक्षा चालवली. काही दिवसांतच रिक्षा चालविण्याची योजना महिलांसाठी आली. तेव्हा नवऱ्याने मला त्याबद्दल विचारले. मी उत्साहाने तयारही झाले. रिक्षा शिकून ती चालवायला लागले. दोन वर्षांत माझ्या ओळखीच्या आणखी काहीजणींनी माझ्याकडून या संदर्भातील माहिती घेतली''. 
किरकटवाडीतील दीपाली जाधव म्हणाल्या, ""महिला रिक्षा चालवणार म्हटल्यावर ती कशी चालवेल? नीट नेईल का ? असा संभ्रम काही प्रवाशांच्या मनात असतो. ते तसं बोलूनही दाखवतात. पण, उत्तम अनुभव आल्यावर आश्‍चर्यही व्यक्त करतात. चांगले तसेच वाईट अनुभवही येतात. पण, ते तर सर्वच क्षेत्रांमध्ये येतात ना. मला वाटतं की, माझ्यासारख्या रिक्षाचालक महिलांची संख्या आणखी वाढली पाहिजे.'' 

दीड वर्षांपासून रिक्षा चालवणाऱ्या शारदा सावंत अरण्येश्वरमध्ये राहतात. त्या म्हणाल्या, ""शहरातील विविध भागांत प्रवाशांची ने-आण करताना आधी नवखेपणा होता. नंतर सर्व रस्त्यांची व्यवस्थित माहिती होत गेली. रिक्षा चालविताना आत्मविश्वासही वाढला.''

पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षाचालक म्हणून महिलांना तयार करणे, रिक्षा मिळवून देणे, तसेच प्रशिक्षण देण्याचे काम जोमाने झाले. पुण्यातही आता गती मिळाली आहे. महिला चालक असल्याने ज्येष्ठ, आजारी व बालकांना रिक्षाप्रवासात अधिक सुरक्षितता जाणवते. 

- आनंद तांबे, प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jalgaon News : पाचोरात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार, २५० गुरे वाहून गेली, असंख्य गावे पाण्याखाली

Hockey Tournament: 'चीनमधील स्पर्धेत सातारकर खेळाडूंची चमकदार कामगिरी': हॉकीपटू वैष्णवी, ऋतुजाचे ‘चक दे इंडिया’; भारतीय संघाचे यश

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2025

Suryakumar Yadav : खिलाडूवृत्तीपेक्षा भावना महत्त्वाच्या; हस्तांदोलन टाळण्यावरून सूर्यकुमारचे स्पष्ट मत, नेमकं काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT