Crime sakal
पुणे

PUB Bar Case : पोलिस निरीक्षकासह सहायक पोलिस निरीक्षक निलंबित

फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील पब बारप्रकरणी सोमवारी शिवाजीनगर ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकासह सहायक पोलिस निरीक्षकला निलंबित करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील पब बारप्रकरणी सोमवारी शिवाजीनगर ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकासह सहायक पोलिस निरीक्षकला निलंबित करण्यात आले. त्यामुळे निलंबनाची कारवाई झालेल्या पोलिसांची संख्या चारवर पोहोचली आहे. या प्रकरणात पबचा मालक, चालक, व्यवस्थापक, आयोजकासह आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आणखी काही जणांना अटक होण्याची शक्‍यता असून, पब बारमध्ये अमली पदार्थांचा वापर करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.

लिक्विड लेझर लाऊंज पब बारचा मालक संतोष विठ्ठल कामठे (रा. रजनीगंध अपार्टमेंट, शिवाजीनगर), पब चालक रवी माहेश्‍वरी (रा. ३८२, पार्क, मॅजिस्ट्रिक, उंड्री), उत्कर्ष कालिदास देशमाने (रा. साईप्रसाद अपार्टमेंट, मुंजाबा वस्ती, धानोरी), योगेंद्र गिरासे (रा. दवन सोसायटी, भूगाव, मुळशी), व्यवस्थापक मानस पस्कुल मल्लिक (रा. जयजवान नगर, येरवडा), पार्टी आयोजक अक्षय दत्तात्रेय कामठे (रा. माळवाडी, हडपसर) यांच्यासह दिनेश मानकर (रा. नाना पेठ), रोहन राजू गायकवाड (रा. भोसले पार्क, हडपसर) यांच्यासह आठ जणांना अटक केली आहे. तर पब मालक सचिन विठ्ठल कामठे यास अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पोलिस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग व महापालिकेने पब, बार, रेस्टॉरंटस्‌वर कारवाई केली. त्यानंतरही गजबजलेल्या फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील लिक्विड लेझर लाऊंज हा पब बार पहाटेपर्यंत सुरू असल्याचा व्हिडिओ रविवारी समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. पबमधील पार्टीत सहभागी झालेल्या तरुणांकडून स्वच्छतागृहात अमली पदार्थांचे सेवन केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत होते. यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ चौकशीचा आदेश दिला. त्यानंतर परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी या प्रकरणाची चौकशी करून प्रारंभी गस्तीवरील दोन पोलिसांचे तत्काळ निलंबन केले. त्यापाठोपाठ गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पबचा चालक, मालक, व्यवस्थापक, आयोजकास अटक केली. पोलिसांनी रविवारीच पब सील करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, सोमवारी या प्रकरणामध्ये पार्टी आयोजक, डीजे व पार्किंग व्यवस्था पाहणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली. त्याचबरोबर या प्रकरणाला जबाबदार धरत, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश पाटील यांना पोलिस आयुक्तांनी निलंबित केले.

फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील पब बार प्रकरणी आठ जणांना अटक केली आहे. अमली पदार्थांचा वापर झाला आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, संबंधित मुलाचा कसून शोध घेतला जात आहे.

- चंद्रशेखर सावंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT