पुणे, ता. १५ : जवळपास दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एका दांपत्याचे आई-वडील होण्याचे दीर्घकाळ जपलेले स्वप्न अखेर फेमकेअर फर्टिलिटी येथे पूर्ण झाले. वंध्यत्व, जननेंद्रियांचा क्षयरोग, गुंतागुंतीचे उपचार आणि उच्च-जोखमीची गर्भधारणा अशा अनेक आव्हानांनी भरलेला त्यांचा प्रवास अखेरीस एका निरोगी मुलीच्या आणि एका निरोगी मुलाच्या जन्माने आनंदात बदलला.
हे दांपत्य दहा वर्षांपासून वंध्यत्वाचा सामना करत होते. प्राथमिक तपासणीदरम्यान सोनोग्राफीमध्ये हायड्रोसॅल्पिंक्स आढळले. या स्थितीत फॅलोपियन ट्यूब बंद होऊन त्यामध्ये द्रव साचते. त्याचबरोबर गर्भाशयाचे आतील अस्तर, म्हणजे एंडोमेट्रियम, पुरेसे विकसित नसल्याचेही दिसून आले. फेमकेअर फर्टिलिटीच्या वैद्यकीय संचालिका आणि वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. पल्लवी टिपले यांच्याकडे उपचार केले. तपासणीच्या निष्कर्षांनुसार डॉ. पल्लवी यांनी टप्प्याटप्प्याने आणि रुग्णाच्या गरजेनुसार वैयक्तिक उपचार योजना तयार केली. भ्रूण प्रत्यारोपणावर परिणाम होऊ नये म्हणून बाधित फॅलोपियन ट्यूब शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आली. गर्भाशयाचे अस्तर सुधारण्यासाठी आणि भ्रूण प्रत्यारोपणासाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी प्लेटलेट-रिच प्लाझ्मा (पीआरपी) थेरपी करण्यात आली. दीर्घ आणि आव्हानात्मक प्रवासानंतर अखेर दोन निरोगी बाळांचा जन्म झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.