पुणे

२५ सप्टेंबरपासून ‘एफएफएस’वरच खत!

CD

२५ सप्टेंबरपासून ‘एफएफएस’वरच मिळणार खते

घरबसल्या साठ्याची माहिती, आगाऊ बुकिंग; जादा दर, लिंकिंगला चाप; एकरी दोन बॅग युरिया, एक बॅग डीएपीची मर्यादा

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १५ ः खत खरेदीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासह शेतकऱ्यांना खत सहज उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात २५ सप्टेंबरपासून ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस) प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीत शेतकऱ्याला ॲपवरून जवळच्या दुकानातील खताचा साठा पाहता येणार असून, आपल्या क्षेत्रानुसार खताचे आगाऊ बुकिंग करता येईल. बुक केलेले खत दोन दिवसांच्या आत स्वतः शेतकरी किंवा कुटुंबातील प्रतिनिधीला घेता येणार आहे. त्यामुळे खतासाठी दुकानांमध्ये अनावश्यक गर्दी व रांगा लावण्याची गरज कमी होणार आहे.
‘एफएफएस’ प्रणाली फार्मर आयडीशी जोडलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या नावावरील क्षेत्राची माहिती तसेच राज्यात त्याने कोठून किती खत खरेदी केले, याची नोंद उपलब्ध होणार आहे. एका हंगामासाठी एकरी १०० किलो (दोन बॅग) युरिया आणि ५० किलो (एक बॅग) डीएपी घेता येणार आहे. निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक युरिया किंवा डीएपी खरेदी करता येणार नाही. इतर खतांवर अशी रेशनिंगची मर्यादा राहणार नाही.

शेतकऱ्याने ‘एफएफएस’ ॲपवर फार्मर आयडीद्वारे लॉगिन केल्यानंतर त्याच्या नावावरील क्षेत्राची माहिती दिसेल. त्यानुसार खताची मागणी नोंदविता येईल. ॲपवर परिसरातील कृषी सेवा केंद्रे आणि तेथील उपलब्ध साठ्याची माहितीही मिळेल. प्रथम चार किलोमीटरच्या परिघातील केंद्र दाखविले जाईल. तेथे साठा नसल्यास दहा किलोमीटर परिघातील केंद्राची माहिती मिळेल.

चौकट

खत बुकिंगची प्रक्रिया
- एफएफएस ॲप डाउनलोड करा
- फार्मर आयडीने लॉगिन करा
- क्षेत्रानुसार युरिया व डीएपीची मागणी नोंदवा
- जवळच्या उपलब्ध कृषी सेवा केंद्राची निवड करा
- बुकिंगनंतर मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांत खत ताब्यात घ्या.


शेतकऱ्याला काय फायदा?
- घरबसल्या खताचा साठा पाहता येणार.
- गरजेनुसार आगाऊ बुकिंग करता येणार.
- बुक केलेले खत दोन दिवसांत (टी प्लस २) घेता येणार.
- छापील एमआरपीपेक्षा जादा दराने विक्रीला आळा.
- अनुदानित खतासोबत टॉनिक, औषधे किंवा अन्य निविष्ठा घेण्याची ‘लिंकिंग’ची सक्ती करता येणार नाही.
- बुकिंग केल्यानंतर संबंधित विक्रेत्याला खत उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार.

नोंदणीसाठी मदत कुठे मिळेल?
‘एफएफएस’ ॲप वापरताना अडचण आल्यास कृषी सखी, कृषी मित्र, पोक्रा समूह सहाय्यक, आत्मा, सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधता येईल.

‘एफएफएस’मुळे खत वाटप अधिक पारदर्शक आणि विनालिंकिंग होणार आहे. याचा सरकार, कंपन्या, शेतकरी आणि विक्रेत्यांना फायदा होईल. शेतकऱ्यांनी खत खरेदीची नवी प्रक्रिया समजून घेऊन त्यानुसारच खरेदी करावी. विनाॲप खत खरेदी करू नये. या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी वेळ आणि पैसा वाचवावा.
- हरिदास हावळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

SCROLL FOR NEXT