तीन जिल्ह्यांत २ लाख
९० हजार टन खतसाठा उपलब्ध
पावसाने गती घेतल्याने खरीप पेरण्यांसोबत खतांची मागणी वाढण्याची शक्यता
ॲग्रोवन वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांत १९ जूननंतर सुमारे २ लाख ९० हजार ८५६ टन रासायनिक खतसाठा उपलब्ध होता. अलीकडे पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केल्याने खरीप पेरण्यांना वेग येण्याची शक्यता असून, त्यासोबतच खतांच्या मागणीतही वाढ अपेक्षित आहे.
उपलब्ध खतसाठ्यामध्ये ६१ हजार ९५ टन युरिया, २१ हजार ४१९ टन डीएपी, ११ हजार ९२ टन एमओपी, १ लाख ४८ हजार ४९५ टन एनपीके आणि ४८ हजार ७५५ टन एसएसपी खताचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
७.५१ लाख टन खतसाठा मंजूर
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांसाठी युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके आणि एसएसपी मिळून एकूण ९ लाख ६४ हजार १६० टन खताची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी कृषी आयुक्तालयाने ७ लाख ५१ हजार ४०० टन खतासाठा मंजूर केले आहे.
२.२७ लाख टन खताचा पुरवठा
मंजूरसाठ्यापैकी जूनअखेरपर्यंत ३ लाख २९ हजार ९०४ टन खत पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यामध्ये १ लाख १२ हजार ९३० टन युरिया, ३७ हजार २६ टन डीएपी, १ लाख ३९ हजार १८८ टन एनपीके आणि ३५ हजार टन एसएसपी खताचा समावेश आहे. यापैकी १९ जूनपर्यंत २ लाख २७ हजार ३२३ टन खताचा प्रत्यक्ष पुरवठा झाला. त्यात ८६ हजार ७४ टन युरिया, ११ हजार २६१ टन डीएपी, ७ हजार ९९३ टन एमओपी, ९२ हजार ४५६ टन एनपीके आणि २९ हजार ५३९ टन एसएसपी खताचा समावेश आहे.
३.२२ लाख टन खतांची विक्री
पुरवठा झालेल्या २ लाख २७ हजार ३२३ टन खतासोबतच एप्रिल २०२६ अखेर मागील हंगामातील ३ लाख ८५ हजार ५५१ टन खतसाठा शिल्लक होता. त्यामुळे खरीप हंगामासाठी एकूण ६ लाख १२ हजार ८७४ टन खत उपलब्ध झाले होते. त्यापैकी १९ जूनअखेर ३ लाख २२ हजार १८ टन विविध प्रकारच्या खतांची विक्री झाली. परिणामी, त्यानंतरही सुमारे २ लाख ९० हजार ८५६ टन खतसाठा विक्रीसाठी उपलब्ध होता.
चौकट
२३ हजार ७८३ टन खतांचा बफर साठा
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांत १९ जूनअखेर युरिया व डीएपी या खतांचा एकूण २३ हजार ७८३ टन बफर साठा उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये २१ हजार ४६५ टन युरिया आणि २ हजार ३१८ टन डीएपी खताचा समावेश आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तीनही जिल्ह्यांसाठी एकूण २६ हजार ३५० टन युरिया व डीएपी खतांचा संरक्षित साठा ठेवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी सुमारे ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
१९ जूननंतर उपलब्ध खतसाठा (टनांमध्ये)
खत प्रकार...उपलब्धता (टन)
युरिया...६१,०९५
डीएपी...२१,४१९
एमओपी...११,०९२
एनपीके...१,४८,४९५
एसएसपी...४८,७५५
जिल्हानिहाय खत उपलब्धता (टनांमध्ये)
जिल्हा...उपलब्धता
छत्रपती संभाजीनगर...८४,२४५
जालना...१,०३,२०४
बीड...१,०३,४०७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.