पुणे

तारळे यात्रा जत्रा

CD

यात्रांच्या हंगामामुळे फुलली बाजारपेठ

तारळ्याची अर्थकारणाला गती; व्यापाऱ्यांत उत्साह

तारळे, ता. ३ : विभागातील ग्रामदैवतांच्या यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू झाला आहे. सर्वत्र यात्रेच्या नियोजनाची धांदल आहे. वाणसामान व मुलांच्या कपडे खरेदीसाठी कुटुंबीयांची धांदल उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून विभागात यात्रेकरूंची वर्दळ वाढली असून, तारळे बाजारपेठ फुलली आहे. गत दोन महिन्यांत मंदावलेल्या धंद्यामुळे हवालदिल झालेल्या व्यापाऱ्यात यात्रा-जत्रांच्या हंगामामुळे समाधानाचे वातावरण आहे.
वर्षातून एकदा येणाऱ्या या ग्रामदैवतांच्या यात्रांना गावापासून बाहेर असणारी सर्व चाकरमानी आवर्जून उपस्थित राहतात. विभागातील पहिल्या टप्प्यात वजरोशी, चिंचेवाडी, खडकवाडी, फडतरवाडी, घोट, आंबेवाडी, जुगाईवाडी, बोर्गेवाडी, भैरेवाडी, जन्नेवाडी, जळव, मरळोशी, ढोरोशी, आंबळे, काळकुटवाडी, बांबवडे, संभाजीनगर व आवर्डे आदी गावांच्या यात्रा होत आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रांना उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पहिल्या दिवशी देवाचा छबिना होतो, दुसऱ्या दिवशी खेळणे म्हणजे मांसाहारी जेवणाचा बेत असतो. सगेसोयरे, मित्र, नातेवाइकांना निमंत्रणे दिली जातात. त्यासाठी लोकांची लगबग सुरू आहे. घरे सजविणे, रंगरंगोटी, मुलांना कपडे खरेदीसाठी महिलांची धावपळ सुरू आहे. या यात्रा-जत्रांनी ग्रामीण अर्थकारणाला वेग आला असून, तारळे बाजारपेठेत यानिमित्ताने उलाढाल होत आहे.

..............

चौकट
................

‘संधी’साधू उमेदवार..

सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशात यात्राही आहेत. परिणामी उमेदवारांना मतदारांना भेटणे सोयीचे झाले आहे. मात्र, हीच सोय गैरसोय देखील बनली आहे. यात्रेकरू मतदारांना अपेक्षा पूर्ण करताना उमेदवाराची दमछाक होत आहे. मतदार यात्रेचा खर्च कसा बाहेर पडेल, याच्या विचारात आहे. त्यामुळे उमेदवारांना गाठून आपले मनसुबा पूर्ण करण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र आहे.
.....................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Accident Highway : पुणे–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर तांदूळवाडीत एसटी बसचा अपघात, २१ प्रवासी असल्याची माहिती

Dhurandhar 2 Trailer: रहमान डकैत मेला… आता लियारीचा नवा बादशाह कोण? ‘धुरंधर २’ ट्रेलरमध्ये रणवीर सिंगचा धडाकेबाज इशारा!

Latest Marathi News Live Update : कमर्शियल गॅस सिलिंडरचे वितरण बंद; हॉस्पिटलला पुरवल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरचं काय करायचं? वितरकांचा सवाल

T20 World Cup: भारतीय संघाने अहमदाबादमधील हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली, पण का? बॅड लक की आणखी काही?

Sairaj Patil UPSC Success : इंग्रजीचं टेन्शन विसरा! कराडच्या पठ्ठ्यानं मराठीतून शिकून यूपीएससीत मारली बाजी; 545 वी रँक मिळवत झाला IPS

SCROLL FOR NEXT