Fifteen thousand bribe demand from Assistant Police Inspector for dropping containers at Urse Toll Naka 
पुणे

उर्से टोल नाक्यावर सहायक पोलीस निरीक्षकाकडून पंधरा हजारच्या लाचेची मागणी 

सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊनमध्ये चेन्नईहून राजकोटला जाणारा कंटेनर सोडण्यासाठी चालकाची अडवणूक करून 20 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीे नंतर 15 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महामार्गच्या सहायक पोलिस निरीक्षकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे.  पैसे स्वीकारल्यानंतर अधिकाऱ्याला सापळा लावल्याची चाहूल लागताच त्याने आपल्या गाडीतून पळून गेला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित रामचंद्र अधटराव (महामार्ग सुरक्षा पथक, वडगाव) याच्यावर या प्रकरणी वडगाव पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे बालरोड लाइन्स यांचे हायड्रोलिक/ एक्सएल गाडीवर चालक असून ते गाडीतून पवनचक्कीचे नेसल घेऊन चेन्नईवरुन  राजकोटला जात होते. तक्रारदार व त्यांचे सहकारी अशा २ गाड्या सत्यजित अधटराव याने पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर उर्से टोलनाक्यावर अडविल्या. ती दोन्ही वाहने 3 मे रोजी लॉकडाऊन उठल्यानंतर  नंतर सोडली जाईल,  असे कंटेनरचालकाला त्याने सांगितले. गाड्या सोडायच्या असतील तर प्रत्येक गाडीचे १० हजार रुपये असे २० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. चालकांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 
त्यानुसार  उर्से टोलनाक्यावर रात्री सव्वा नऊ वाजता सापळा रचण्यात आला. तक्रारदार याच्याकडून सत्यजित अधटराव हा तडजोडी अंती १५ हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर त्याला एसीबीने लावलेल्या सापळ्याचा संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम टेबलवर फेकून दिली आणि आपल्या कारमध्ये बसून वेगाने तो पुण्याकडे पळून गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir Donation Details: चार वर्षांत अयोध्येतल्या राम मंदिराला किती दान मिळालं? सोनं आणि पैसा बघून बसेल धक्का!

IND vs AFG 3rd ODI: रोहित - जैस्वालने एकही चेंडू न खेळताही भारताला मिळाल्या ५ धावा, पण का? जाणून घ्या खरं कारण

Raigad Drone Row: रायगडावर शिवप्रेमींच्या नैसर्गिक विधीचे ड्रोन चित्रीकरण; लौकिक गोळे यांच्यावर आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

Omraje Nimbalkar : पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालाबाबत उच्च न्यायालयात जाणार

Balewadi News : पदपथावर बेकायदेशीर कूपनलिका (बोअरवेल) खोदकाम? जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT