पुणे

अंजीर फळपिकासाठी विमा योजना

CD

पान १०
----------------

अंजिरासाठी विमा योजनेतील तरतुदी
-----------------------------------
विनयकुमार आवटे
-------------------------------
अंजिराच्या आंबिया बहरासाठी ही योजना अधिसूचित जिल्हा, अधिसूचित तालुका, अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते.
संबंधित विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्प अंतर्गत नोंदवलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल. अंजीर पिकास खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस खालील प्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.
समाविष्ट जिल्हे : पुणे, छत्रपती संभाजीनगर

हवामान धोके व कालावधी प्रमाणके व नुकसान भरपाई रक्कम (प्रति/हे.)
१. अवकाळी पाऊस
दि. ०१ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये सलग ३ दिवस १० मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस राहिल्यास रक्कम रु.६४,०००/- नुकसान भरपाई देय होईल.
२. जास्त आर्द्रता
दि. ०१ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये सलग २० दिवस सापेक्ष आर्द्रता ८० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास रक्कम रु.९६,०००/- नुकसान भरपाई देय होईल.
गारपीट दि. ०१ डिसेंबर ते ३१ मे विमा संरक्षण रक्कम प्रती हेक्टर = रु. ५३,०००/-


-फळबाग आवश्यक वय ः ३ वर्ष
-विमा संरक्षण रक्कम प्रती हेक्टर ः नियमित रु. १,६०,०००/-
- गारपिटीपासून विमा संरक्षण रक्कम प्रती हेक्टर ः रु. ५३,०००/-
- योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२६

- गारपिटीपासून नुकसान झाल्यास नुकसानीची घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीस नुकसानीची सूचना देणे आवश्यक आहे. ( केंद्र शासन हेल्पलाईन १४४४७ )
- शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता साधारण विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के मर्यादेत रु. ८००० प्रती हेक्टर. नियमितसाठी आणि गारपिटीसाठी रु. २६५० प्रति हेक्टर. ( विमा हप्ता ३५ टक्यांपेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्यांनी भरायचा विमा हप्ता मध्ये वाढ असेल )
- शेतकऱ्याचा ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक बंधनकारक आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हे बंधनकारक आहे.
- मृग बहर २०२६ मध्ये अंजीर पीक विमा घेतलेल्या विमा अर्जदार यांना पुन्हा आंबिया बहरामध्ये अंजिरासाठी विमा योजनेत सहभाग घेता येणार नाही.
- पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.
- बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेवू शकतात. त्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक, आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जीओ टॅगिंग केलेला फोटो, बँक पासबुकवरील बँक खात्याबाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्विस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.
- विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसुल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.
- शेतकऱ्यांनी फळपीक लागवड केलेली नसताना किंवा उत्पादन योग्य फळपीक नसताना, दुसऱ्याच्या जमिनीवर किंवा शासनाच्या जमिनीवर, अकृषक जमिनीवर विमा काढून विमा योजनेत सहभाग घेतल्यास त्यांचे विरुद्ध कडक कारवाई होऊ शकते . यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे उत्पादन योग्य वयाची फळबाग आहे, त्यांनीच योजनेत सहभाग घ्यावा.
- शेतकऱ्यांनी फक्त स्वतःच्या जमिनीवर विमा घ्यावा. शेतकऱ्यांना डिजिटल क्रॉप सर्व्हे बंधनकारक आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हे आणि विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज केव्हाही रद्द होऊ शकतो.
- एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक अधिसूचित फळपिके असल्यास तो या सर्व पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेवू शकतो.
- योजनेत ‍प्रति शेतकरी सहभागासाठी कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र २० गुंठे (०.२० हे.) अशी मर्यांदा राहील . तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रती शेतकरी ४ हे. मर्यादेपर्यंत राहील.
- विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्याचे बँक खाते आधार आधारित पेमेंटसाठी लिंक असावे .
- शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in
- शेतकऱ्यांनी उत्पादन योग्य फळपीक नसताना विमा योजनेत सहभाग घेतल्यास त्यांना पुढील ५ वर्ष कृषी योजनांचा लाभ देण्यात येणार नाही. यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे उत्पादन योग्य वयाची फळबाग आहे, त्यांनीच योजनेत सहभाग घ्यावा.
- अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी १४४४७ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.
--------------------
( लेखक कृषी आयुक्तालयामध्ये कृषी संचालक (नियोजन व प्रक्रिया ) आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१९ चेंडूंत ९० धावा: ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे पोर्तुगालसाठी दमदार शतक! T20 World Cup पात्रता फेरीत रोनाल्डोचा देश अव्वल

Chakan MIDC Development: ‘चाकण’च्या समस्या सोडविण्यासाठी हालचाली; ‘सकाळ’च्या पाठपुराव्यानंतर प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर

IND vs SL 2nd Test: भारत-श्रीलंका दुसऱ्या कसोटीपूर्वी संघात बदल; तगड्या ऑल राऊंडरसह २ खेळाडूंची एन्ट्री, मिळणार पदार्पणाची संधी

Snakebite Notifiable Disease: सर्पदंश आता अधिसूचित आजारांच्या यादीत; पाच वर्षांत १० हजारांहून अधिकांना दंश; नोंदणीला गती

KL Rahul Praises Manav Suthar: ‘एकाच शैलीत विविधता’! १० विकेट घेणाऱ्या मानव सुथारचे के. एल. राहुलकडून कौतुक

SCROLL FOR NEXT