पुणे

सासवड : दोन गटातील वादाचे रुपांतर तुंबळ हाणामारीत; फिर्यादी दाखल

श्रीकृष्ण नेवसे

सासवड : येथे प्रसिध्द नेताजी चौक व परिसरात दोन दिवस धुमसत असलेल्या तरुणांच्या दोन गटातील वादाचे रुपांतर तुंबळ हाणामारीत झाले. तू माझ्याकडे का पाहीले.. एवढ्या (कथित) कारणावरुन हा वाद सुरु झाला व दोन्ही गटातील हाणामारीने सहाजण गंभीर जखमी झाले. तर दोन्ही गटांतील मिळून 16 आरोपी या एकमेकांविरुध्दच्या फिर्यादीत आले. जखमी उपचारार्थ रुग्णालयात दाखल असून आरोपींचा शोध सुरु आहे. 

सासवड (ता. पुरंदर) या शहरात गेली अनेक दिवस शांतता होती. परंतू गेली अनेक दिवसांत येथे शहरात झालेली व सासवडकरांमध्ये चर्चिली गेलेली ही कोयते व इतर शस्त्रांची मोठी मारामारी आहे. कारण दोन्ही गटांच्या फिर्यादीवरुन व जखमींची स्थिती व संख्या पाहता.. खूनाचा प्रयत्न असाच गुन्हा दाखल झाला आहे. ही तुंबळ हाणामारीची घटना सासवड न्यायालयालगत कऱहा स्वाद हाॅटेलच्या प्रांगणात घडली. एका गटाकडून स्वप्नील दीपक टकले (वय 23, रा. नेताजी चौक, सासवड, ता.पुरंदर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार योगेश टकले, गौरव म्हेत्रे, किरण हे जखमी आहेत. तर संशयित आरोपींमध्ये विनय सुधीर जमदाडे, गौरव पांडुरंग धोत्रे, धनंजय मुन्ना भोंगळे, मल्हार राजेंद्र साळुंखे, परेश सलिल बागवान, अक्षय भोलेनाथ निघोल, अभिषेक प्रमोद गोंधळे,  कुणाल तळेकर, स्वप्निल दत्तात्रय ढगारे (सर्व रा. सासवड) यांचा समावेश आहे. 

दुसऱया गटाकडून मनोज पांडुरंग म्हेत्रे (वय 26, रा. म्हेत्रे आळी,सासवड ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार त्यांच्या गटाचे गौरव पांडुरंग म्हेत्रे, विनय जमदाडे, धनंजय भोंगळे हे गंभीर जखमी आहेत. तर त्यांच्यावर हल्ला करणारे संशयित आरोपींमध्ये.. सोन्या जाधव, योगेश दादा टकले, शुभम बाळासाहेब टकले, स्वप्नील दीपक टकले, प्रवीण मधुकर भोसले, किरण राजेंद्र दीक्षित, संकेत दीपक टकले (सर्व रा. नेताजी चौक सासवड). दोन्ही घटनांनंतर सासवड पोलीस परीसरातील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे व  महिला पोलीस उपनिरीक्षक एस. डी. दुरंदे हे तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT