Crime Sakal
पुणे

जागा खरेदी नोंदणीसाठी लाच मागणाऱ्या खासगी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

जागा खरेदीची नोंदणीच्या कामासाठी 18 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे - तलाठी कार्यालयात जागा खरेदीची (Land Purchasing) नोंदणीच्या (Registration) कामासाठी 18 हजार रुपयांची लाच (Bribe) घेणाऱ्या एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल केला आहे.

नामदेव नागटीळक (रा. फुरसुंगी) असे गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी 31 वर्षीय व्यक्तीने "एसीबी'कडे तक्रार दिली आहे. हा प्रकार 11 ते 17 फेब्रुवारी दरम्यान घडला. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी जागा खरेदी केली आहे. नागटीळक याने वैयक्तीक प्रभावाचा वापर करून संबंधीत जागेची फुरसुंगी येथील तलाठी कार्यालयात नोंदणी करण्यासाठी तक्रारदाराकडे 18 हजार रुपये मागितले होते. या प्रकरणाची "एसीबी'ने पडताळणी केली. त्यानंतर नागटीळक याच्याविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुनील क्षीरसागर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेल अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

ढिंग टांग : पंख असलेला माणूस..!

आजचे राशिभविष्य - २ जुलै २०२६

SCROLL FOR NEXT