Professor
Professor 
पुणे

प्राध्यापकांच्या रिक्‍त जागा भरा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - देशभरातील महाविद्यालये, विद्यापीठे आणि अभिमत विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या कमतरतेमुळे शिक्षणाच्या दर्जावर होणारा परिणाम लक्षात घेत विद्यापीठ अनुदान आयोगाने सहा महिन्यांत रिक्त जागा भरण्याचा आदेश दिला. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला असता महाविद्यालयीन शिक्षकांची दोन हजार पदे, तर विद्यापीठातील शिक्षकांची सुमारे १६१ पदे रिक्त आहेत.

प्राध्यापकांच्या भरतीसाठी आयोगाने विहित पद्धती दिलेली आहे. त्यानुसारच भरतीप्रक्रिया करायची आहे. त्याचा भंग केल्यास कारवाई करण्यासह निधी रोखण्याचा इशाराही दिला आहे. भरतीप्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार उच्च शिक्षण संस्थांनी पंधरा दिवसांत रिक्त पदांचा आढावा घ्यायचा आहे. त्यानंतर महिनाभरात संबंधित प्राधिकाऱ्यांकडून या भरतीला परवानगी घ्यायची आहे. ती मिळाल्यानंतर पंधरा दिवसांत पदभरतीची जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करायची आहे. निवड समित्यांची स्थापना झाल्यानंतर पंधरा दिवसांत या समित्यांची बैठक घ्यायची आहे. त्यानंतर महिनाभरात पदांसाठी आलेल्या अर्जांची छाननी करून ती संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करायची आहे. पुढील महिनाभरात निवड समितीने निवडलेल्या उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण करायच्या आहेत. त्यात निवडलेल्या उमेदवारांच्या नियुक्ती पत्रांना संबंधित प्राधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊन ती महिनाभरात संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. आयोगाने हा कालावधी निश्‍चित करून देताना संपूर्ण भरतीप्रक्रिया ही आयोगाच्या निकषांनुसार झाली पाहिजे, अशा सक्त सूचना दिल्या आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाचा प्राध्यापक भरतीचा मुद्दा उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेशी निगडित असल्याने रिक्त जागा भरण्याबाबत राज्य सरकारकडे आम्ही पाठपुरावा करीत आहोत. सरकारकडून लवकर सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे.
- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT