पुणे

शरद पवार आणि अलका कुबल यांची बारामतीत भेट

सकाळ वृत्तसेवा

बारामती : सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. बारामतीतल्या "गोविंदबाग" या पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर हेही या प्रसंगी उपस्थित होते. वर्षभरापूर्वी "काळूबाईच्या नावानं चांगभलं" या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान सेटवरील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. या दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यावेळी शरद पवार यांनी सेट वरील सर्व कलाकारांची आस्थेवाईकपणे चौकशी करत भेटीचे निमंत्रण दिले होते.

त्या निमंत्रणानंतर अलका कुबल यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मालिकांचे चित्रीकरण, कोरोनामुळे येणार्‍या अडचणी आणि आगामी प्रोजेक्ट संदर्भात या प्रसंगी चर्चा झाली. पवार यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, यात प्रामुख्याने मराठी चित्रपट सृष्टीतील निर्मात्यांनी ग्रामीण भागात चित्रिकरण करावे अशी सूचना पवार यांनी केली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेली आहे, असा लोकेशन्सवर शूटींग होऊ शकते. ग्रामीण जीवनाचे रंग यातून समोर येऊ शकतात व ग्रामीण अर्थकारणालाही त्याने काही दिलासा मिळू शकेल, अशी पवार यांची यातील भूमिका होती. निर्माते-दिग्दर्शक समीर आठल्ये, अभिनेत्री प्राजक्ता दिघे, आमदार मकरंद पाटील, निखील घाडगे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET paper leak: आंदोलनादरम्यान कोणतीही 'नारेबाजी' चालणार नाही! दिल्ली आंदोलनात केवळ 'या' चार घोषणा देण्याचं 'सीजेपी'कडून आवाहन

जंतर मंतरच्या आंदोलकांची भूक भागवतायत 'अदृश्य हात'; देशभरातून पिझ्झा, बर्गरसह जेवणाची ऑर्डर

Live Updates Marathi : पुण्यातील काँग्रेस भवनाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Vaibhav Sooryavanshi : ३ सामने खेळवून बाकावर बसवले, गंभीरच्या निर्णयावर प्रथमच व्यक्त झाला वैभव... म्हणाला, प्रशिक्षक मला..

Temghar Dam: टेमघर धरण ५० टक्के भरले; पुणेकरांसाठी महिनाभराच्या पाण्याचा दिलासा

SCROLL FOR NEXT