पुणे

लेण्याद्रीला 100 बेडच्या कोविड 19 केअर सेंटरची उभारणी अंतिम टप्प्यात

दत्ता म्हसकर

जुन्नर : श्री क्षेत्र लेण्याद्री ता.जुन्नर येथील शंभर बेडच्या कोविड 19 केअर सेंटरची उभारणी अंतिम टप्प्यात असून, गुरुवारी ता.२१ रोजी सांयकाळी  लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी येथील कामाची पाहणी करून आढावा घेतला.

खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांनी संयुक्तपणे सहा सेंटरची महत्वपूर्ण मागणी सरकारकडे केली होती. त्यापैकी महाळूंगे, वाघोली, शिरूर, मंचर आणि लेण्याद्री (जुन्नर) ही पाच कोविड 19 केअर सेंटर लवकरच कार्यान्वित होत असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तहसीलदार हनुमंत कोळेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार,  गट विकास अधिकारी विकास दांगट, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी जयश्री काटकर, जिल्हा परिषद  सदस्य अंकुश आमले, सभापती विशाल तांबे, लेण्याद्री देवस्थान चे अध्यक्ष कैलास लोखंडे आणि सर्व संचालक उपस्थित होते. यावेळी केअर सेंटरच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रिपोर्ट 24 तासात...

कोरोनाची लक्षणं असलेल्या रुग्णाचे स्वॅबचे नुमने याठिकाणी घेण्यात येणार असून, पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतील. तसेच या तपासणीचा अहवाल 24 तासाच्या आत प्राप्त होईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. हे सेंटर सध्या शंभर बेड्सचे असणार आहे.

कोरोना पॉझिटिव्ह पेशंट्सचे उपचार या केअर सेंटरमध्ये करण्यात येतील. त्यासाठी रूग्णास पुण्याला नेण्याची गरज भासणार नाही, अशी व्यवस्था उभारण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या सर्व कामात आपली प्रशासकीय यंत्रणा वेगाने राबत आहे, असे अतुल बेनके यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Supriya Sule : आईवर बोलला तर करारा जबाब देईन - सुप्रिया सुळे

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT