archaeology1 
पुणे

अखेर "या' विभागातील कामगार कपात रद्द 

सकाळवृत्तसेवा

मंचर (पुणे) : लॉकडाउनच्या काळात कर्मचारी कपात करण्याचा पुरातत्त्व विभागाच्या मुंबई सर्कलच्या अधीक्षक पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी काढलेला आदेश रद्द करण्याची खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांच्याकडे केलेली मागणी मान्य करण्यात आली असून हा आदेश रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भात सर्वांत प्रथम बातमी शनिवारी (ता. 25) "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाली होती. 

पुरातत्त्व विभागाच्या मुंबई सर्कलचे अधीक्षक पुरातत्त्व शास्त्रज्ञ (Superintending Archaeologist) डॉ. राजेंद्र यादव यांनी 24 एप्रिलला कार्यालयीन आदेश काढून या कार्यालयांतर्गत येणाऱ्या उप मंडलातील (sub circle) हंगामी कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या सूचना देऊन या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे सूचित केले होते. त्यामुळे जुन्नरसह उपमंडलातील (sub circles) कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्‍यात आल्या होत्या.

या कामगारांच्या भवितव्याचा विचार करून डॉ. कोल्हे यांनी तातडीने केंद्रीय सांस्कृतिक खात्याचे मंत्री प्रल्हादसिंग पटेल व पुरातत्त्व विभागाच्या महासंचालक उषा शर्मा यांना पत्र पाठवून कर्मचारी कपातीचा आदेश तत्काळ रद्द करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन अखेरीस आज पुरातत्त्व विभागाच्या मुंबई सर्कलचे अधीक्षक पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी काढलेला कर्मचारी कपातीचा आदेश रद्द करण्यात आला. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

पुरातत्त्व विभागाच्या कर्मचारी कपातीचा आदेश मागे घेतल्याबद्दल केंद्रीयमंत्री पटेल आणि महासंचालक शर्मा यांनी अतिशय संवेदनशीलता दाखवत हा निर्णय रद्द केला आणि कामगारांचे भवितव्य सुरक्षित केल्याबद्दल दोघांचेही खासदार डॉ. कोल्हे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT