पुणे

मसूर : ग्रामसभा बातमी

CD

नळ जोडणीस वित्त आयोगाचा निधी कशाला?

मसूर ग्रामसभेत सवाल; ग्रामपंचायतीवरील खर्चाचा प्रयत्न हाणून पाडला

मसूर, ता. १७ : मूळ १४ कोटी रुपयांच्या जलजीवन योजनेला यापूर्वीच पाच कोटी रुपयांचे वाढीव अंदाजपत्रक मंजूर झाले आहे. त्यामुळे गावच्या विकासासाठी स्वतंत्रपणे मिळणाऱ्या १६ व्या वित्त आयोगाच्या निधीतून नळ जोडणीसाठी अंदाजे एक कोटी रुपये खर्च करण्याचा घाट कशासाठी? असा सवाल येथील ग्रामसभेत ग्रामस्थांनी उपस्थित केला. माजी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी होते.


जलजीवन योजना संपूर्ण गावासाठी असून, ती केवळ २११ नळधारकांसाठी नाही. ‘हर घर नल’अंतर्गत ठेकेदारानेच सरसकट नळजोडणी करून देणे आवश्यक आहे. ठेकेदाराच्या चुका आणि नळ जोडणीचा खर्च ग्रामपंचायतीवर लादण्याचा प्रकार ग्रामस्थांनी हाणून पाडला. ठेकेदाराने सरसकट नळ जोडणी केल्याशिवाय पाणी योजना सुरू करू नये, असा ठरावही ग्रामसभेत झाला. नंदकुमार जगदाळे, जिल्हा बँकेचे संचालक लहूराज जाधव, पोलिस पाटील तिलोत्तमा वेल्लाळ, आजी-माजी सरपंच, उपसरपंच सदस्य, विविध पदाधिकारी, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

योजनेच्या निकृष्ट कामाबाबत यापूर्वीही ग्रामसभांत तक्रारी केल्या आहेत. ठेकेदाराने नळ जोडणी पूर्ण केल्याशिवाय योजना ताब्यात घेणार नसल्याची भूमिका यापूर्वीच घेतली होती. याबाबत अधिकारी, ठेकेदार, ग्रामस्थांच्या उपस्थितीत २१ ऑगस्टला स्वतंत्र ग्रामसभा घेण्याचे ठरले.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १८१ घरकुले मंजूर झाली असून, वंचित व गरजू नागरिकांनी आठ दिवसांत मागणी अर्ज करावेत, असे आवाहन केले. स्मार्ट मीटरची सक्ती, वीज खांबाची देखभाल, कालव्याचे २१ दिवसांचे पाणी रोटेशन, सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, स्मशानभूमीत सीसीटीव्ही व्यवस्था, डास निर्मूलनासाठी धूर फवारणी, अंगणवाड्यांना सौरदिवे, बचत गटांसाठी स्वतंत्र इमारत, पशुवैद्यकीय दवाखान्यात सीसीटीव्ही व्यवस्था, तसेच घरपट्टीवरील पाच टक्के अतिरिक्त दंडाला विरोध अशा विविध विषयांवर ग्रामस्थांनी चर्चा केली.
..........
चौकट
.........

अप्पर तहसील कार्यालयाची मागणी

येथे अप्पर तहसील कार्यालय व्हावे, अशी मागणी यावेळी केली. अप्पर तहसील कार्यालय सुरू झाल्यास मसूरसह आजूबाजूच्या अनेक गावांतील शेतकरी, नागरिकांची सोय होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या मागणीचा तत्परतेने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
..........................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dimaagi Naxal Party: ‘कॉकरोच’नंतर आता ‘दिमागी नक्सल पार्टी’! मोदींच्या वक्तव्यावरून नवा राजकीय ट्विस्ट; रातोरात लाखो फॉलोअर्स

MP Dr. Amol Kolhe : माळशेज भोरांडे प्रकल्पासारखे एकूण 59 प्रकल्प आगामी काळात राज्यात प्रस्तावित

Marathi News Live Updates : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे संशोधन क्षेत्रासाठी १५० एकर जमीन आहे - शरद पवार

Viral Video: शेवटच्या बॉलवर ड्रामा! ४ धावांची गरज, चौकार न जाताच संघाचा जल्लोष; पण नंतर जे घडलं ते पाहून सर्वच अवाक

MP Supriya Sule : महापालिकेस राज्यातील शाळा, शिक्षणाबाबत सरकारची भूमिका उदासीनच

SCROLL FOR NEXT