finance company
finance company Sakal
पुणे

व्यक्तीला बदनाम करण्याचे अधिकार फायनान्स कंपन्यांना कोणी दिले?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कर्ज घेतल्यानंतर व्याज किंवा मुद्दल वेळेत परत केले नाही म्हणून कर्जदाराला फायनान्स कंपन्या (Finance Company) शिवीगाळ करीत असल्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. या सर्वांच्या पुढे जाऊन आता कर्जदाराचे फोटो अश्‍लील पद्धतीने मॉर्फ करून त्याला धमकावण्यात येत असल्याचे प्रकार आता उघड होत आहे. त्यामुळे कर्जदार व्यक्तीला बदमान करण्याचे अधिकार फायनान्स कंपन्यांना कोणी दिले? त्याचे काय दुष्पपरिणाम होवू शकतो याचा विचार फायनान्स कंपन्या करीत आहेत का? असा सवाल नाईजिल राजन मटानकोट यांनी उपस्थित केला आहे.

फायनान्स कंपनीने अश्‍लील फोटो व शिवीगाळ असलेले मेसेज व्हायरल केल्याने नार्इजिल यांचा मामेभाऊ अनुग्रह ए. पी. प्रकाशन (वय २२, रा. माणिकबाग, सिंहगड रस्ता, मुळ रा. केरळ) याने २७ जानेवारी रोजी सिंहगड रस्ता परिसरात आत्महत्या केली. या प्रकरणी आसान लोन कंपनी आणि तिच्या कर्मचाऱ्या विरोधात सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फायनान्स कंपनीतून प्रकाशन याला फोन आला व तुमच्याकडे आठ हजार रुपयांच्या कर्जाची वसुली बाकी आहे.

पैशांची मागणी करीत फायनान्स कंपनीतील एका कर्मचाऱ्याने अनुग्रहचे अश्‍लील फोटो व शिवीगाळ असलेले मेसेज त्यांचे नातेवार्इक, मित्र आणि सहकारी यांना पाठवून व्हायरल केले. त्यातून अनुग्रहने आत्महत्येचे पाऊल उचलले. या प्रकारामुळे फायनान्स कंपन्यांकडून होत असलेल्या जाचाचा एक भयानक प्रकार उघडकीस आला आहे.

संरक्षण क्षेत्रातील संशोधक होण्याचे स्वप्न राहिले अधुरे :

अनुग्रह हा मुळचा केरळ येथील असून त्याचे वडील सेवानिवृत्त आहेत. तर आर्इ गृहिणी आहे. अनुग्रहने गेल्या वर्षी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची (डीआरडीओ) परिक्षा दिली होती. सध्या तो एका खासगी कंपनीत नोकरी करीत होती. संरक्षण क्षेत्रातील संशोधक होण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले होते. मात्र फायनान्स कंपनीने त्याचे हे स्वप्न अधुरे ठेवले.

कर्ज घेतले होते की नाही याबाबत शंका :

अनुग्रह याने कधीच घरी कर्ज घेतल्याचा उल्लेख केला नाही. फायनान्स कंपनीने त्याला आठ हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचे सांगितले होते. त्याच्या वसुलीसाठी त्याला त्रास देण्यात येत होता. पण त्याने कर्ज घेतले होते की नाही याबाबत शंका आहे. त्याला दुसऱ्याच प्रकरणात अडकविण्यात आले की काय यांची शंका असून याबाबत पोलिस योग्य तपास करीत आहेत, असे नार्इजिल यांनी सांगितले. या गुन्ह्याचा तपास सिंहगड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT