fund sakal
पुणे

Pune News : ‘महाज्योती’तर्फे ३१४ उमेदवारांना युपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी आर्थिक साहाय्य

३१४ विद्यार्थी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. यापैकी २९८ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे एकूण एक कोटी ४९ लाख रुपये जमा करण्यात आले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या  (महाज्योती) वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ३१४ विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे.

हे आर्थिक साहाय्य वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचा निकाल जूनमध्ये जाहीर झाला. त्यानुसार महाज्योतीमार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना एकरकमी ५० हजार रुपयांचे अर्थ साहाय्य देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते.

या अंतर्गत ३५६ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यातील ३१४ विद्यार्थी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. यापैकी २९८ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे एकूण एक कोटी ४९ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. तर उर्वरित पात्र विद्यार्थ्यांनी बँक तपशील सादर केल्यावर त्यांचे अर्थसाहाय्य वितरित करण्यात येणार असल्याची माहिती ‘महाज्योती’चे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांनी दिली.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांना वितरित केलेल्या अर्थसहाय्याचा या परीक्षेच्या तयारीसाठी लाभ होईल, अशी माहिती शिरसाठे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सरसकटऐवजी अटींवर बोट ठेवून नुकसानीचे पंचनामे; उसाच्या भरपाईसाठी पूर्ण पीक पाण्याखाली असण्याची अट; दिवाळीपूर्वी मदत देण्यासाठी लगबग

Jowar Flour Uttapam Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी आणि टेस्टी ज्वारीचा उत्तप्पा, सोपी आहे रेसिपी

आजचे राशिभविष्य - 13 ऑक्टोबर 2025

सावधान..! CCTV, सुरक्षारक्षक नसलेली घरे चोरट्यांकडून टार्गेट; पळून जाताना ‘गुगल मॅप’चा आधार; पोलिसांकडे गस्त वाढविण्याची मागणी, पण...

PAK vs SA Test: 'आता हा ड्रामा करणार!' बाबर आझमच्या DRS वेळी रमीज राजाने लाईव्ह सामन्यात काढली लाज? पाहा Video

SCROLL FOR NEXT