पुणे

पुणे : विनामास्क फिरले म्हणून...

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर : पूर्व हवेलीत कोरोनाने हाहाकार माजवला असतानाही, आपण त्या गावचेच नाही या अर्विभावात मास्कविना फिरणाऱ्या लोणी काळभोर, थेऊर व कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील शंभरहून अधिक नागरिकांना ग्रामपंचायत प्रशासन व लोणी काळभोर पोलिसांनी कारवाईचा दणका दिला. मास्कविना फिरणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची आकारणी केली. तर लोणी काळभोर पोलिसांनी बारा नागरिकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हेही 
दाखल केले. 

लोणी काळभोरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या पथकाने सोमवारी (ता. २९) दिवसभरात थेऊरफाट्यावर मास्कविना फिरणाऱ्या 35 जणांवर दंडात्मक कारवाईबरोबरच 12 नागरिकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हेही दाखल केले. तर दुसरीकडे लोणी काळभोर, कुंजीरवाडी व थेऊर ग्रामपंचायत प्रशासनाने सोमवारी दिवसभरात मास्कविना फिरणाऱ्या सत्तरहून अधिक जणांवर दंडात्मक कारवाई केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोणी काळभोर, उरुळी कांचन, कुंजीरवाडी, थेऊर व कदमवाकवस्ती या पूर्व हवेलीतील पाच ग्रामपंचाय हद्दीत मागिल सात दिवसापासुन कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळुन आहेत. या पार्श्वभुमिवर हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी दोन दिवसापुर्वी लोणी काळभोर ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेतली घेऊन, ग्रामपंचायत, महसूल विभाग व पोलिस प्रशासनाला मास्कविना फिरणाऱ्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सुचनेनुसार लोणी काळभोर पोलिस व ग्रामपंचायत प्रशासनाने सोमवारपासून वरील कारवाई सुरु केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत सरपंच सुनिता धुमाळ यांनी सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे, कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहबूब लकड़े, ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे यांच्या समवेत सोमवारी सकाळी दहा वाजनेच्या सुमारास रस्त्यावर उतरुन बावीस नागरिकांना प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच यावेळी सुनिता धुमाळ यांनी, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व 10 वर्षाच्या आतील मुलांनी घराबाहेर पडू नये असे आवाहनही केले. 

कारवाई कडक करणार

या कारवाईबाबत अधिक बोलताना पोलिस निरीक्षक सुरज बंडगर म्हणाले, पूर्व हवेलीत मागील सात दिवसात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येऊनही, नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. तर दुसरीकडे अनेकजण बिनधास्त मास्कविना दुचाकीवरुन गावभर हिंडताना दिसत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे व मास्कचा वापर करणे हेच दोन प्रभावी उपाय आहेत. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्यास नागरिक तयार नसल्याने या पुढील काळात ही कारवाई आनखी कठोर करण्याचेही आदेश पोलिसांना दिले आहे. ही कारवाई आजपासूनच आणखी तीव्र करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: ''माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही'', 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या आरोपावर सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

एक नायक तर दुसरी खलनायिका; टीव्हीचे गाजलेले चेहरे पुन्हा भेटीला येणार; कोण आहेत ते? प्रेक्षकांनी सांगितली नावं

Jalgaon News : खेळता खेळता हरवला जीव! जळगावात १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Electricity Supply: अदानी हटाव..., प्रीपेड मीटरला ग्राहकांचा नकार; महावितरण खाजगीकरणाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune Market Committee : संचालक मंडळ बरखास्त करून ईडी व इन्कम टॅक्स चौकशी करा; राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष विकास लवांडे यांची मागणी

SCROLL FOR NEXT