पुणे

बनावट मृत्यूपत्रप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा

पुणे -  बनावट मृत्यूपत्रप्रकरणी तलाठ्यासह नऊ जणांविरोधात विमानतळ ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. शशिकांत धनाजी कोलते, संतोष धनाजी कोलते, हेमलता धनाजी कोलते, अशोक पाटीलबुबा सोनवणे, विलास खंडेराव चौधरी, जयमाला अशोक सोनवणे, अनिता विलास चौधरी, संजय मारुत लगण आणि तलाठी भाऊसाहेब अशी आरोपींची नावे आहेत. 

एका महिलेच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी बनावट मृत्यूपत्र तयार केले होते. त्यानंतर तलाठ्याशी हातमिळवणी करून दप्तरी नोंदी केल्या. संबंधित मिळकत हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दत्तात्रेय बबन खांदवे यांनी फिर्याद दिली. ही तक्रार नोंदविण्यासाठी फिर्यादींने ऍड. सतीश नायर यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली होती. संबंधित आरोपी असलेले बांधकाम व्यावसायिक आणि इस्टेट एजंट यांनी वडिलोपार्जित मिळकत हडपण्याचा प्रयत्न केला. बनावट कागदपत्रे, बनावट मृत्युपत्र करून सरकारची फसवणूक करण्यात आली, अशी फिर्याद दिली होती. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. खान यांनी गुन्हा दाखल केला व तपासाचे आदेश विमानतळ पोलिसांनी दिले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Pinarayi Vijayan: १० वर्षांच्या सत्तेनंतर मोठी पडझड! LDF पक्षाचा दारुण पराभव, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, UDF ची दमदार एंट्री

MI vs LSG Live: निकोलस पूरनसह लखनौच्या फलंदाजांकडून मुंबईची धुलाई! उभं केलं आव्हानात्मक लक्ष्य; जसप्रीत बुमराह पुन्हा फेल...

HSC Supplementary Exam : बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी मंगळवारपासून अर्ज करण्याची सुविधा होणार उपलब्ध

लुटलं, लुटलं, लुटलं! अनैतिक विजय, पराभव दिसताच ममता बॅनर्जी संतापल्या; १६व्या फेरीअखेर पिछाडीवर

SCROLL FOR NEXT