पुणे

सिंहगड, खडकवासल्याला जातायं...500 ची पावती ठरलेली

सिंहगड, खडकवासला परिसरात फिरण्यासाठी येणारांना पाचशे रुपये दंड व गुन्हा दाखल होणार; हवेली पोलीसांची माहिती

निलेश बोरुडे

किरकटवाडी: शनिवार, रविवार तसेच इतर दिवशी खडकवासला धरण, सिंहगड किल्ला परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याची माहिती हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली आहे.(FIR Was Lodged with fined Rs 500 Against who visiting Sinhagad, Khadakwasla area)

लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता करण्यात आल्यानंतर मागील रविवारी (दि.13 रोजी) सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. प्रत्यक्षात मात्र पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार सिंहगड किल्ला व आजुबाजूची पर्यटन स्थळे अद्यापही पर्यटकांसाठी बंद आहेत. मागील रविवारी झालेली पर्यटकांची गर्दी व त्यामध्ये झालेले कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन या पार्श्वभूमीवर हवेली पोलीसांनी या आठवड्यात नियम मोडून येणाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाई करण्याची तयारी केली आहे.

हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा, खडकवासला धरण चौक, डोणजे फाटा,गोळेवाडी चेक पोस्ट, खेड शिवापूरकडून येणारांसाठी कोंढणपूर फाटा अशा ठिकाणी कडक बंदोबस्त व नाकाबंदी करण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. वाहनांची तपासणी केली जाणार जाणार आहे. फिरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला पाचशे रुपये दंड तर करण्यात येणार आहेच शिवाय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 188 नुसार गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही नियम मोडून फिरण्यासाठी येऊ नये असे आवाहन पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT