पुणे

Jitendra Awhad: श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं जितेंद्र आव्हाडांवर पुण्यात गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात रामाबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं आव्हाड यांच्यावर कालपासून टीका टिप्पणी केली जात आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान करुन धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (FIR registered aginst Jitendra Awhad at Pune for making controversial statement about Lord Rama)

आव्हाडांविरोधात भाजपनं आव्हाड यांच्याविरोधात काल आंदोलन केलं होतं. यावेळी धीरज घाटे यांनी विश्रामबाग पोलिसांकडं आव्हाडांविरोधात तक्रार दिली होती. यावरुन कलम २९५ अंतर्गत आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं आव्हाड यांच्यावर कालपासून टीकेला सामोरं जावं लागतं आहे. आव्हाड राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले होते की, "तुम्ही इतिहास वाचत नाही, मनात ठेवत नाही, राजकारणात आपण वाहत जातो. अरे राम आपला आहे, बहुजनांचा आहे.

शिकार करून खाणारा राम आमचा आहे. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला चाललात पण आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि त्यामुळं मटणही खातो. हा रामाचा आदर्श आहे राम शाकाहारी नव्हता तो मांसाहारी होता. १४ वर्ष जंगलात राहणारा माणूस शाकाहार शोधायला कुठं जाणार?"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: शिपायाचा पगार जाणार लाखाच्या घरात! आठव्या वेतन आयोगाकडे फिटमेंट फॅक्टरचा प्रस्ताव

Viral Video : ‘’मी सहन करू शकलो नाही.., मी राजीनामा दिलाय... ’’, सांगत चक्क जीएसटी उपायुक्त पत्नीशी बोलताना ढसाढसा रडले!

Latest Marathi News Live Update : गायिका अंजली भारतीच्या वादग्रस्त वक्तव्याची राज्य महिला आयोगाने घेतली दखल

Video: कचऱ्यात पडलेल्या देवाच्या मूर्ती मुस्लिम व्यक्तीने उचलल्या; स्वच्छ करुन केलं विसर्जन, व्हिडीओ व्हायरल

Viral Video: प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ पाहून अमित शहांच्या पत्नीने काय केलं असंकाही की, तुम्हीही कौतुक कराल

SCROLL FOR NEXT