firangai-devi 
पुणे

दापोडीत श्री. फिरंगाई देवीचा उत्सव सुरू

सकाळवृत्तसेवा

जुनी सांगवी - दापोडी येथील ग्रामदैवत श्री.फिरंगाई देवीचा उत्सव सुरू आहे. या देवीचे मुळस्थान पुणे जिल्ह्यातील व दौंड तालुक्यातील कुरकुंभ या गावी आहे. दापोडी स्थित फिरंगाई उत्सवा दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फिरंगाई महिला भजनी मंडळ, विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ, संत्सग महिला भजनी मंडळ, गणेश नगर महिला भजनी मंडळ, विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ पवारवस्ती, श्री.फिरंगाई देवी जागरण गोंधळ पार्टी यांचा भजनांचा कार्यक्रम यानिमित्ताने होणार आहे.

श्री.देवीच्या पालखीचे प्रस्थान संध्याकाळी कुरकुंभ येथे पालखीच्या मानकऱ्यासह होणार आहे. आज श्री.नितीन काळजे (महापौर पिंपरी चिंचवड) यांच्या हस्ते सायंकाळी ७ वाजता दापोडी येथे श्री.फिरंगाई देवीची आरती व महापुजा करण्यात येणार आहे. महापुजेनंतर  श्रींच्या पालखी छबिना सोहळ्याची सुरूवात होणार आहे. यावेळी नगरसेवक रोहित आप्पा काटे, राजाभाऊ बनसोडे, स्वातीमाई काटे, आशाताई शेंडगे, नाना काटे, राजाभाऊ काटे, अविनाश काटे, संतोष काटे, वसंत काटे, विजय किंडरे, ज्ञानेश्वर भाडाळे, आदेश काटे आदि ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत .

तसेच श्री.फिरंगाई देवीच्या उत्सवानिमित्त भव्य कुस्त्यांचा आखाडा गुरुवार ता. ३० आखाडा, दापोडी रेल्वे स्टेशन मागे, शितळादेवी चौक, दापोडी येथे संपन्न होणार आहे. 

महिलांच्या कुस्त्यांनी आखाडा रंगणार 
कुस्त्यांच्या या मैदानी खेळात महिलांनी सहभाग नोंदवल्याने कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकीन व महिला मोठ्या प्रमाणावर येणार असल्याचे उत्सव समितीच्या वतीने सांगण्यात आले. या खेळादरम्यान भारत केसरी पै.योगेश बोंबाळे विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै.बाला रफीक यांच्या कुस्तीचे मुख्य आकर्षण राहणार आहे. विजयी कुस्तीगिरांना अकरा लाख रूपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच नगरसेवक रोहित आप्पा काटे यांच्या कडुन चांदीची गदा देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT