Fire at the sponge godown in Nana Peth Pune sakal
पुणे

पुण्यातील नाना पेठमधील स्पंजच्या गोडाऊनला आग

एक कामगार गंभीर जखमी

- मोहिनी मोहिते --------

नाना पेठ: क्वार्टर गेट, चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज शेजारील असलेल्या गोडाऊनला 31 मार्च रोजी रात्री 11:30 सुमारास भीषण आग लागली. यावेळी चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यामध्ये कामगार रंजन कश्यप यांची प्रकृती गंभीर असल्याची समजते. तसेच एक सामान्य नागरिक (नाव समजू शकले नाही) हे जखमी असून अग्निशमन अधिकारी प्रभाकर उम्राटकर यांच्या पायाला जखम झाली आहे. त्यांचावर 108 मधे उपचार करुन केईएमला नेण्यात आले आहे. तसेच फायरमन सुधीर नवले यांच्या पायाला मुका मार लागला आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

यावेळी चारचाकी, दुचाकी स्पेअर पार्ट, स्पंज, लाकडी सामान गोडाउन, चक्की कारखाना असे आदी चार हजार स्के फुटांचे पत्र्यांचे शेड मध्ये आगीने पेट घेतला. सदर घटनेत मोठे नुकसान झाले असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. एका जेसीबीच्या सहाय्याने गोडाऊन मधील जळीत समान काढण्यास मदत झाली. यावेळी आग विसविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 फायरगाड्या, 2 अँब्युलन्स दाखल करण्यात आल्या. यावेळी रात्री 12:41 वा. आग नियंत्रणात करण्यात आली असून कुलिंग करण्याचे काम अद्याप सुरू आहे. अशी माहिती अग्निशमन दलाचे मुख्यअधिकारी सुनील गिलबिले यांनी माहिती देताना सांगितले.

यावेळी अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी सुनील गिलबिले, सहाय्यक विभागीय अधिकारी रमेश गांगड, अग्निशमन अधिकारी प्रभाकर उम्राटकर, सचिन मांडवकर, चंद्रकांत गावडे, मनीष बोंबले, अजीम शेख असे आदी 60 ते 70 कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालघर साधू हत्याकांडाचे आधी आरोप केले, आता पक्षात का घेतलं? CM फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, भाजपकडून प्रवेशाला स्थगिती

Latest Marathi Breaking News: भूमकर पुलावर अपघात, पाच गाड्यांना कंटेनरची धडक

CM Devendra Fadnavis: मित्रपक्षांना शत्रू समजू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला, युती म्हणून एकत्र लढणार

Kolhapur News: कुरुंदवाडच्या रणांगणात कलाटणी! ठाकरे गट शाहू आघाडीसोबत; काँग्रेस ‘एकाकी’

Video Viral: वाहत्या पुरात हरीणाला हत्तीनं दिलं जीवनदान, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT