fire broke out in the hostel of Tarachand Hospital students in Pune rashta Peth marathi news  sakal
पुणे

Pune Fire News : पुण्याच्या रास्ता पेठेतील विद्यार्थींनींच्या वसतिगृहात आग; शैक्षणिक साहित्य, लाकडी सामान जळून खाक

सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचा प्रकार समोर आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे- रास्ता पेठेतील ताराचंद रुग्णालयामधील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, विद्यार्थिनींचे शैक्षणिक आणि इतर साहित्य जळून खाक झाले.

वस्तीगृहात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या मुख्यालय आणि कसबा केंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाले. तीन मजली असलेल्या वसतिगृहात पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक चारमध्ये आग लागली होती.

जवानांनी प्रथम विद्यार्थिनी सुरक्षित असल्याची खात्री केली. या खोलीतील तीन विद्यार्थिनी आणि वसतिगृहातील इतर सर्वजण बाहेर आले होते. जवानांनी खोलीत आगीवर पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. या घटनेत खोलीमधील शैक्षणिक साहित्य, लाकडी सामान व इतर वस्तू पूर्ण जळाल्या. खोलीमधील हिटरमुळे आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

आग लागल्याचे समजताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही तेथे उपलब्ध असलेल्या १८ अग्निरोधक उपकरणांचा (फायर एक्स्टिंगविशर) वापरुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक दलाचे अधिकारी पंकज जगताप, वाहनचालक सचिन चव्हाण, समीर शेख, तांडेल सुनील नामे, संजय गायकवाड आणि जवान भूषण सोनावणे, सतीश ढमाळे, अक्षय शिंदे, परेश जाधव, केतन नरके, आतिश नाईकनवरे, शुभम देशमुख यांनी आग आटोक्यात आणली.

अग्निशामक दलाकडून शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, विविध मॉल, इमारतीमध्ये आग लागल्यास आपत्कालीन परिस्थितीत काय उपाययोजना करावी, याबाबत मार्गदर्शन केले जाते. त्याचा नक्कीच उपयोग होतो, हे आज रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले. आग आटोक्यात आणण्यासाठी प्राथमिक स्वरुपात वापरलेली अग्निरोधक उपकरणे नक्कीच महत्वाची ठरली.

- देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशामक अधिकारी, पुणे महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahapalika Election: सर्वात मोठी बातमी! 'या' प्रभागातील निवडणूकीला न्यायालयाची अंतरिम स्थगिती, मतदान कधी होणार?

Latest Marathi News Live Update : पुण्यातील प्रभाग ९ चे राजकारण तापणार

Madhav Gadgil: ‘नीरी’ला कटू सत्याची करून दिली आठवण; पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांनी पर्यावरण अहवालातील त्रुटी केल्या होत्या उघड!

Lonar Lake Level: कमळजा मातेच्या मुखवट्याला पाण्याचा स्पर्श; लोणार सरोवरातील जलपातळी आणखी धोक्याच्या टप्प्यावर!

IPO Market : सरकारी मिनीरत्न कंपनीत गुंतवणुकीची संधी! आजपासून IPO खुला; आधी जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT