Pune Fire Esakal
पुणे

Pune Fire: पुण्यात आगीचे सत्र सुरुच; मार्केट यार्ड परिसरात गोडाऊनला भीषण आग

गंगाधाम सोसायटीच्याजवळ असलेल्या काकडे वस्तीत जवळपास तीन एकर परिसरात आग पसरली

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यात पुन्हा एकदा अग्नितांडव सुरू झालं आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात अग्नितांडव सुरू आहे. गंगाधाम सोसायटीच्या जवळ असलेल्या काकडे वस्तीत जवळपास तीन एकर परिसरामध्ये ही आग पसरली आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ दूरपर्यंत पसरले आहेत. (Latest Marathi News)

आज (रविवारी) सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास ही आग लागली. नंतर आगीने रौद्ररूप धारण केले आहे. यामुळे परिसरातील काही इमारती रिकाम्या करण्याचा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. जवळपास 20 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.(Latest Marathi News)

ही आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही. तर या आगीमध्ये अनेक 20 गोडाऊन जळाले आहेत. या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दलाचे प्रयत्न सुरू आहेत. तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

पुणे शहरात काही दिवसांपूर्वी मध्यरात्री आगीच्या दोन मोठ्या घटना समोर आल्या होत्या. पुणे शहरातील वाघोली येथे गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुण्यातील टिंबर मार्केटमध्येही मोठी आग लागली होती.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT