पुणे

बाणेरमधील मायलेकींना आगीतून वाचवण्यासाठी धावला 'मारुती'

शीतल बर्गे

बालेवाडी : उन्हाळ्यांच्या महिन्यात ठिकठिकाणी आगी लागण्याच्या घटना सर्रास घडतात. यात मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी देखील होते. बाणेर येथील शिंदे - पारखे मळ्यात देखील एका छोट्या घरात आग लागल्याची घटना घडली होती. आपल्या शेजारच्या घरात आग लागल्याचे समजताच मारुती बनकर (वय 45)मदतीसाठी धावून गेले. त्या घरातील माय-लेकींना सुखरूप बाहेर काढले. तसेच दोन भरलेली सिलिंडरही बाहेर काढले. तेवढ्यात आगीचा भडका उडाला त्यामुळे मारुती बनकर चांगलेच भाजले असून सध्या पिंपळे गुरव येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बाणेर येथील कपिल मल्हार सोसायटी जवळील शिंदे पारखे मळा या ठिकाणी (ता 30 एप्रिल) रोजी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान गंगा कुरवर (वय - 40) व त्यांची मुलगी श्रीदेवी (वय -14)(मूळ गाव - कर्नाटक) या दोघी घरात काम करत असताना गॅस वर तेल तापत ठेवले होते, तेल उकळले होते. त्यानंतर तेलाने अचानक पेट घेतला आणि घरात मोठी आग पसरली.

खोली लहान असल्यामुळे इतर सामानानेही लगोलग पेट घेतला. यावेळी मुलीने शेजारी राहणारे मारुती बनकर (वय- 45) यांना मदतीसाठी बोलावले. बनकर यांनी क्षणाचाही विचार न करता आधी माय-लेकींना घरातून बाहेर काढले, तसेच घरातील दोन सिलिंडरही बाहेर नेऊन ठेवले. आग विझवण्याच्या गडबडीमध्ये कोणीतरी आगीवर पाणी ओतले त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात बनकर हे पन्नास टक्के भाजले आहेत.

सध्या ते पिंपळे गुरव येथील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. बनकर हे कुरियर पोहचविण्याचे काम करतात तर त्यांची पत्नी सारिका एका महाविद्यालयात सेविकेचे काम करते. त्यांना दोन लहान मुले आहेत. त्यातच संपूर्ण कुटुंबाला पंधरा दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली असल्यामुळे दोघांना ही कामावर जाता आले नाही आणि आता हे संकट समोर उभे आहे. बनकर यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार महिनाभर तरी त्यांना रुग्णालयातच ठेवावे लागणार आहे. तसेच काही सर्जरीही कराव्या लागणार आहेत असे त्यांच्या पत्नी सारिका यांनी सांगितले. आधीच कोरोनाने रोजगार मिळाला नाही आणि आता हे मोठे संकट या कुटुंबास समोर उभे राहिले आहे, यातून मार्ग कसा काढायचा हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest : नेपाळमध्ये हिंसाचार सुरुच, भारतीय बसवर हल्ला करत प्रवाशांना लुटले; जखमींना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीत आणले

Sakal Newspaper Ranking: ‘सकाळ’ देशात ‘टॉप टेन’मध्ये, वर्तमानपत्रांनी नोंदविली २.७७ टक्क्यांची वाढ

Latest Marathi News Updates : नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा आज शपथविधी; राष्ट्रपती भवनमध्ये सोहळा

बार्शी तालुका हादरला! 'शेतकऱ्याने मानसिक त्रासातून संपवले जीवन'; पत्नीस शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी, त्रास असाह्य झाला अन्..

Hong Kong Open 2025 : आयुषचा जागतिक पदक विजेत्याला धक्का; पुरुषांच्या एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT