लक्ष्मीपूजनदिनी आठ ठिकाणी आग
साताऱ्यात अग्निशामक दलाच्या जवानांकडून तातडीने मदतकार्य
सातारा, ता. ९ : नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहर आणि परिसरात आठ ठिकाणी आग लागली. यापैकी किल्ले अजिंक्यतारा, चारभिंती परिसरात सकाळी आणि रात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीत वृक्षसंपदा जळून खाक झाली, तर अन्यत्र ठिकाणी लागलेल्या आगीत ऊस, नारळाचे झाड जळाले. या घटनांची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.
नरक चतुर्दशीला सकाळी किल्ले अजिंक्यतारा येथील मंगळाई देवी आणि चारभिंती परिसरात फटाक्यांमुळे आग लागली. याबरोबरच करंजे आणि तामजाईनगर परिसरातील शेतात उसाच्या फडाला आग लागली. या चारही ठिकाणी अग्निशामक दलाने तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली. या घटनेत वृक्ष, तसेच उसाच्या फडाचे नुकसान झाले.
लक्ष्मीपूजन झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास शेकडो युवक, युवती किल्ले अजिंक्यतारा आणि चारभिंती परिसरात शहरात फुटणारे फटाके पाहण्यासाठी, फटाके फोडण्यासाठी जमले होते. या दोन्ही ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली. याची माहिती कळताच अग्निशमनची वाहने घटनास्थळी पोहचली. अग्निशामक दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुमारे अर्धा पाऊण तासानंतर आग आटोक्यात आणली.
...............................
कोट
नागरिकांनी हवेत उडणारे फटाके फोडताना काळजी घ्यावी. शहर व परिसरात आगीची घटना घडल्यास अग्निशामक दल नियंत्रण कक्ष (०२१६२ - २३१३३६) यांच्याशी संपर्क साधावा.
- अमित निकम, मुख्य अग्निशमन अधिकारी
-----------------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.