पुणे

पटेल रुग्णालयातील आगीच्या घटनेचे होणार फायर सेफ्टी ऑडीट

सकाळवृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट - पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार पटेल रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरला शनिवारी (ता.५) आग लागली होती. या घटनेचे फायर सेफ्टी ऑडीट करण्याचा निर्णय बोर्ड प्रशासनाने घेतला आहे. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागली होती.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे फायर ब्रिगेड आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून हे फायर सेफ्टी ऑडीट करण्यात येत आहे. फायर सेफ्टी ऑडीटच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही बोर्ड प्रशासनातर्फे कऱण्यात येणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर येथील वायरिंग गेल्या १५ ते २० वर्षांपासूनचे जूने आहे. बोर्ड प्रशासनातर्फे पटेल रुग्णालयातील अन्य सेवासुविधांकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. तसेच जुन्या झालेल्या वायरिंगमुळे शॉर्ट सर्कीट झाले. मात्र, तेथील कर्मचार्यांनी तात्काळ कळविल्यामुळे दुर्घटना टळली. फायर सेफ्टी ऑडीट हे बोर्ड प्रशासनाचे अंतर्गत कामकाज आहे. लवकरच त्याचा अहवाल मिळल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. दरम्यान, बोर्ड प्रशासन पटेल रुग्णालयाच्या आवारातच स्वतंत्रपणे पॉवर स्टेशन तयार करत आहे. त्यामुळे मेटर्निटी वॉर्ड साठी विद्युत पुरवठा करणे सोईस्कर होईल.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT