fired at company in Hinjewadi Pune  
पुणे

पुणे : हिंजवडीतील कंपनीला भीषण आग

सकाळ वृत्तसेवा

हिंजवडी : माण येथील रायसोनी इंडस्ट्रियल पार्क मध्ये असणाऱ्या व्हेरोक लायटिंग सिस्टीम (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भीषण आग लागून कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले. मंगळवारी (ता. 18) पहाटे तीनच्या सुमारास ही आग लागली. तब्बल 5 तास उलटून गेले तरी आग आटोक्यात आली नव्हती. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याचे हिंजवडीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी सांगितले. मात्र शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. 

हिंजवडी माण आयटी  पार्कच्या दुसऱ्या टप्यात ही कंपनी आहे. या कंपनीत चारचाकी टाटा व महिंद्रा कंपनीच्या चारचाकी गाड्याचे टेल लॅम्प व हेड लाइट असे स्पेअर पार्ट बनविले जातात. पहाटे तिन च्या सुमारास अचानक आग लागल्याने स्पेअर पार्ट ने पेट घेतल्याने आगीने रुद्र रूप धारण केले. तेथील कर्मचाऱ्यांनी आग विझविन्याचा प्रयत्न केला. परंतु प्लास्टिक पार्ट असल्याने आगीने अवघ्या अर्ध्या तासात रुद्र रूप धारण केले. प्रशासनाने तत्काळ एमआयडीसी अग्निशामक दलाला पाचारण केले . परंतु तोपर्यंत संपूर्ण कंपनी ला आगीने वेढा घातला होता. या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नसून कम्पनी तील तिघेजण भाजले  आहेत. पोलिसांनी त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 एमआयडीसी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाच्या तब्बल 10 गाड्या व खाजगी टँकर आग विझवण्यासाठी प्रयत्नशील होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT