Crime Sakal
पुणे

पुण्यात भरदिवसा गोळीबार; पळ काढल्याने वाचला जीव

सकाळ वृत्तसेवा

वारजे/पुणे : कार्यालयाच्या बाहेर थांबलेल्या बांधकाम ठेकेदारावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास वारजे परिसरात घडली. हल्लेखोरांनी ठेकेदाराच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या, मात्र तो तेथून टेकडीच्या दिशेने पळाल्याने सुदैवाने त्याला गोळी लागली नाही. गोळीबाराची ही घटना आर्थिक वाद किंवा पूर्ववैमनस्यातून झाली असल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

रवींद्र सखाराम तागुंदे (वय 36, रा. वारजे) असे गोळीबारातुन बचावलेल्या बांधकाम ठेकेदाराचे नाव आहे. तागुंदे हा बांधकाम ठेकेदार आहे. तसेच तो जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसायही करतो. त्याचे वारजे येथील वंडर फ्युचरा नावाच्या इमारतीमध्ये कार्यालय आहे. शनिवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास तो कार्यालयात आला. मात्र कार्यालयात जाण्यापुर्वी तो काही वेळ कार्यालयाबाहेर थांबला होता. त्यावेळी त्याच्याबरोबर काही कामगार होते, मात्र काही वेळानंतर कामगार तेथून निघून गेले. त्याचवेळी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरून दोन वेगवेगळ्या दुचाकीवरून चौघेजण त्याच्या कार्यालयासमोर आले. त्यांनी तांगुदेच्या कार्यालयासमोर दुचाकी लावली. त्यानंतर त्यांनी कार्यालयासमोर थांबून पिस्तुलातून दोन गोळ्या तांगुदेच्या दिशेने झाडल्या. गोळीबार झाल्यानंतर तागुंदे घाबरला, तो पाठीमागील बाजूस असलेल्या टेकडीच्या दिशेने धावत सुटला. त्यावेळी हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांनी आणखी दोन गोळ्या पिस्तुलातुन झाडल्या. सुदैवाने त्यास गोळी लागली नाही.

दरम्यान, हल्लेखोर दुचाकीवरुन बाह्यवळणमार्गावरून वारज्याच्या दिशेने पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी घटनास्थळी भेट दिली. तागुंदेची पाश्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. दोन खून प्रकरणात त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. त्याच्यावर पूर्ववैमनस्य किंवा आर्थिक वादातून हल्ला झाल्याची शक्‍यता गायकवाड यांनी व्यक्त केली. तागुंदेच्या कार्यालयाजवळ सीसीटीव्ही आहेत. हि घटना सीसीटीव्हीध्ये चित्रीत झाली असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके पाठविण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

MS Dhoni ने स्वत:हून भारताचे कर्णधारपद सोडले नव्हते, तर...; तब्बल ९ वर्षांनी सिलेक्टर्सने उलगडलं रहस्य

Paneer Sandwich Recipe: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा फेव्हरेट! 10 मिनिटांत तयार करा टेस्टी पनीर सँडविच

Tax Laws : ‘सीबीडीटी’च्या सूचनांना कायद्याचे बळ

SCROLL FOR NEXT