firing at hotel owner at Dapode in Velhe taluka 
पुणे

वेल्हे तालुक्यात थरार! दापोडे येथे भरदिवसा हॉटेलचालकावर गोळीबार

मनोज कुंभार

वेल्हे,(पुणे) : वेल्हे तालुक्यातील दापोडे येथील हॉटेलचालक तरुणावर आज सकाळी साडेआठच्या सुमारास गोळीबार झाला. या हल्ल्यामध्ये विलास नथू बोरगे ( वय ४०)हा तरुण जखमी झाला आहे. हल्लेखोर हे एका दुचाकीवरुन तीन जण आले होते यांनी गोळीबार केल्याची माहिती स्थानिक नागरीकांनी दिली.   

जखमी तरुणाचे मुळ गाव वेल्हे तालुक्यातील करंजावणे येथील रहिवासी असून हॉटेल व्यवसायानिमित्त दापोडे या गावामध्ये रहात होता. एकाच दुचाकीवर आलेल्या तीन जणांनी या तरुणावर गोळीबार केला व यानंतर हल्लेखोर कुसगाव खिंड मार्गे खेड शिवापुरकडे पसार झाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, जखमी झालेला तरुण हा जवळच असलेल्या खाजगी दवाखान्यात गेला असता त्याच्या छातीत गोळी लागल्याचे निदर्शनास आल्या नंतर येथील डॉक्टर भिमराव शेंडकर यांनी १०८ क्रमांकावर फोन करुन अँब्युलन्स बोलावून पुढील उपचारासाठी पुढे पाठविण्यात आले.

हल्लेखोरांनी काळी कपडे घातली होती तर, तोंड पुर्ण झाकले होते. पळुन जात असताना हल्लेखोर यांची दुचाकी शिरगावाजवळ घसरली होती, परंतु घाई गडबडीने हल्लेखोर उठून कुसगाव खिंड मार्गे शिवापुर पुणेकडे पसार झाले. याबाबत वेल्हे पोलिसांनी आरोपी गेलेल्या मार्गाकडे पोलीस पथके रवाना केले आहेत. अधिक तपास वेल्हेचे सह्ययक पोलीस निरीक्षक विनायक देवकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

टँकरला धडकून कारचा चुराडा, डॉक्टर दाम्पत्यासह २ चिमुकल्यांचा मृत्यू; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Marathi News Live Updates: गरोदर पत्नी व मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशी

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

SCROLL FOR NEXT