Pune Crime sakal
पुणे

Pune Crime : नवी सांगवीत गोळीबार; तरुणाचा खून

दुचाकीवर आलेल्या दोघांनी तरुणावर गोळीबार करून खून केल्याची घटना बुधवारी (रा. २९) रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपळे गुरव : दुचाकीवर आलेल्या दोघांनी तरुणावर गोळीबार करून खून केल्याची घटना बुधवारी (रा. २९) रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली.

नवी सांगवीतील माहेश्‍वरी चौकाजवळ इंद्रप्रस्थ गृहनिर्माण सोसायटीसमोर मुख्य रस्त्यावर हा प्रकार घडला; मात्र नेमके कारण समजू शकले नाही. दीपक दत्तात्रेय कदम (वय ३०, रा. जयमालानगर, जुनी सांगवी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

त्याच्यावर गोळीबार करून मारेकरी पळून गेले. दरम्यान, २०१४ मध्ये संतोष काची यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दीपकसह त्याच्या सात-आठ साथीदारांविरुद्ध दाखल आहे. गोळीबारानंतर जखमी अवस्थेत दीपक रस्त्यात पडून होता.

सांगवी पोलिस ठाण्यापासून जवळच घटनास्थळ आहे. पोलिसांनी तत्काळ दीपकला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. कदम हा विवाहीत होता. खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT