Pune Crime News Esakal
पुणे

Pune Crime News: हडपसर परिसरात व्यावसाईक वादातून दिवसाढवळ्या गोळीबार, घटनेने खळबळ

Pune Crime News: एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिक ठेकेदारावर दिवसाढवळ्या गोळीबार केला आहे. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहेत. हडपसरमधील शेवाळेवाडी येथे ही घडली आहे. ठेकेदारीच्या वादातून शेवाळेवाडीत दिवसाढवळ्या गोळीबार झाला आहे. त्यामुळे शेवाळेवाडी परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे, सोसायटी सिक्युरिटी कामगार पळविण्याच्या वादातून एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिक ठेकेदारावर दिवसाढवळ्या गोळीबार केला आहे.

यामध्ये ठेकेदार गंभीर जखमी झाला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी एक माजी सैनिक असून दुसरा आरोपी त्यांचा मुलगा आहे. जयवंत खलाटे असे जखमी माजी सैनिकाचे नाव आहे. तर ऋषिकेश शेंडगे, सुधीर शेंडगे असे ताब्यात केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. घटना घडल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे व गुन्हे टीमने भेट देऊन तपासाची संपूर्ण माहिती घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी दोघेही माजी सैनिक असून दोघांचा सिक्युरिटी ठेकेदारीचा व्यवसाय आहे. आज(बुधवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास शेवाळवाडी येथील संपन्न होम सोसायटी समोर दोन ठेकेदारांमध्ये सिक्युरिटी कामगारांवरून वाद झाला. दोन सिक्युरिटी ठेकेदारांमध्ये या अगोदर दामोदर विहार येथे वाद झाला होता.

त्यानंतर शेंडगे घरी जाऊन पिस्तूल घेऊन आला आणि शेवाळेवाडीतील संपन्न होम्स सोसायटी समोर दोन गोळ्या झाडल्या, यामध्ये एक गोळी जयवंत खलाटे यांच्या पायाला लागली तर एक जमिनीवर लागली, यामध्ये खलाटे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी आर्मी रुग्णालयात दाखल केले आहे.

या गोळीबार घटनेमुळे शेवाळेवाडी परिसरामध्ये नागिरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : उकाड्यानंतर दिलासा! मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाची हजेरी

Manoj Tiwary : सत्ता जाताच, आपले फिरले! ममता बॅनर्जी सरकारवर भारतीय क्रिकेटपटूचे गंभीर आरोप; प. बंगालमध्ये होता क्रीडा मंत्री

Education Success: ग्रामपंचायत शिपायाची मुलगी पूर्वा कदमची बारावीत ८६ टक्के गुणांसह चमक; सीए होण्याच्या स्वप्नाला आर्थिक बळाची प्रतीक्षा

Latest Marathi News Live Update : मोबाईल चोरी अपयशी ठरल्याने महिलेवर हल्ला

Baramati Crime: फेसबुकवर स्वस्त गहूचे आमिष; व्यापाऱ्याला निर्जन ठिकाणी बोलावून रिव्हॉल्व्हरच्या धाकावर लूट

SCROLL FOR NEXT