sagar patil 
पुणे

इलेक्ट्रिकल वस्तू बनविणारा तो भारतातील पहिला अंधव्यक्ती

प्रणिता मारने

पुणे : अंध असूनही डोळसपणे इलेक्ट्रिकल क्षेत्रात काम करणारे सागर पाटील हे भारतातील पहिले अंध व्यक्ती आहेत. त्यांनी अंध व्यक्तींना रोजगार मिळवून देण्यासाठी आयआयजी ही संस्था स्थापन केली. स्वत: शिक्षण घेऊन अनेक इलेक्ट्रिकल वस्तू ते स्वत: तयार करतात. 'प्रोत्साहन' प्रदर्शनात त्यांनी सौरऊर्जेवर चालण्याऱ्या इलेक्ट्रिकल वस्तू ठेवल्या आहेत.

मैत्रिणींच्या गटाने सुरू केलेले 'प्रोत्साहन' प्रदर्शन पुण्यात एरंडवणे येथील मनोहर मंगल कार्यालयात सुरू आहे. या प्रदर्शनामध्ये दिव्यांग व्यक्तींनी स्वत:च्या हातानेे तयार केलेले रंगीबेरंगी काचेने सजवलेले दिवे, लॅम्पस्, आकर्षक आकारांचे दागिने अशा अनेक वस्तूही आहेत. या प्रदर्शनातील अनेक जण वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे प्रात्यक्षिकही करून दाखवतात. त्याचबरोबर त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध कला गुणही सादर करून दाखवली गेली.

दिव्यांग व्यक्तींसाठी गेली 16 वर्षे अव्याहतपणे हा उपक्रम सुरू आहे. यंदाच्या वर्षी अहमदनगर येथील आकांक्षा रिहॅबिलीटेशन सेंटरच्या सविता काळे आणि स्वत: दिव्यांग असून दिव्यांगाना समुपदेशन करणारे तसेच निवृत्त बॅँक अधिकारी संजय सप्रे यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यामध्ये राज्यातून 13 संस्था आणि 32 वैयक्तिक व्यक्तींनी सहभाग घेतला होता. मुख्य प्रवाहापासून लांब राहूनही या प्रदर्शनच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यात रंग भरले गेले. ज्यांना बाहेरची दुनिया प्रत्यक्षात अनुभवतात त्यांच्याहून अधिक चांगली दृष्टी या दिव्यांगांमध्ये असल्याचं या प्रदर्शनातून जाणवत होतं.

''दरवर्षी आतुरतेने सगळी दिव्यांग लोक या प्रदर्शनाची वाट बघत असतात. गेली 16 वर्षे आम्ही एका कुटुंबासारखे राहतो. त्याचबरोबर या प्रदर्शनामध्ये सहभागी झाल्याने अनेक दिव्यांग व्यक्तींचा आत्मविश्वास वाढला आहे.''
- रेखा कानिटकर, आयोजिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

Latest Maharashtra News Updates : ..मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? - संजय राऊतांचा सवाल!

Farmer Situation : औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील वृद्ध शेतकरी दांपत्य ओढताहेत हाताने कोळपे

टीआरपीमध्ये अचानक वर आली 'ही' मालिका; 'या' मालिकांना टाकलं मागे; अभिनेत्याने केली खास पोस्ट

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

SCROLL FOR NEXT